वसंतगड ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:54 AM2021-01-02T04:54:29+5:302021-01-02T04:54:29+5:30
वसंतगड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गटांत नेहमीच अटीतटीची लढत पाहायला मिळते. यावर्षीही बाजार समितीचे माजी सभापती आर. वाय. नलवडे ...
वसंतगड येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गटांत नेहमीच अटीतटीची लढत पाहायला मिळते. यावर्षीही बाजार समितीचे माजी सभापती आर. वाय. नलवडे व विरोधक यांच्यात अटीतटीची लढत होईल, अशी चर्चा परिसरात होती. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विरोधी गटाकडून एकही अर्ज दाखल न झाल्याने आर. वाय. नलवडे यांच्या गटाने दाखल केलेले नऊ उमेदवारांचे अर्ज व त्याविरोधात एकही अर्ज न आल्याने ते बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी रसाळ यांनी सांगितले.
गत पंचवार्षिक निवडणुकीत चंद्रसेन पॅनेलला तीन जागा, तर हनुमान पॅनेलने सहा जागा जिंकत सत्तांतर केले होते. त्यामुळे गावात विरोधी गट सक्रिय झाल्याचे बोलले जात होते. मात्र, यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी गटाला अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारी न मिळाल्याने मोठी नामुष्की त्यांच्यावर ओढवली, तर माजी सभापती नलवडे यांच्या गटाचे अमित रघुनाथ नलवडे, सविता नवनाथ गोडसे, राजश्री हणमंत महाडिक, सुहास दिनकर कदम, योगेश मोहन गुरव, कविता निंबाळकर, शारदा आनंदा येडगे, सुरेखा जालिंदर पाचुकते, जालिंदर दादू जामदार हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
अमित नलवडे, सुहास गायकवाड, अमोल चव्हाण, शंकर कदम, रामचंद्र कोकरे, सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब जाधव, लक्ष्मण महाडिक, महिपती कोकरे, दिनकर शिवदास, दत्ता कोकरे, दिनकर पाटील, रवी जामदार, आनंदा येडगे, हनमंत निंबाळकर, चंद्रकांत पाटील, संतोष पाटील, अंकुश निंबाळकर, बाळू पाटील, सचिन कदम, संदीप पाटील यांच्याहस्ते बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
फोटो : ०१केआरडी०३
कॅप्शन : वसंतगड (ता. कऱ्हाड) येथे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.