वृध्दाला पेटवून जिवे मारल्याप्रकरणी एकाला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:28+5:302021-02-10T04:39:28+5:30

सातारा : एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वृध्दाला पेटवून देत जिवे मारल्याने सोनगाव बंगला येथील एकाला जन्मठेप आणि ...

One was sentenced to life imprisonment for burning an old man to death | वृध्दाला पेटवून जिवे मारल्याप्रकरणी एकाला जन्मठेप

वृध्दाला पेटवून जिवे मारल्याप्रकरणी एकाला जन्मठेप

Next

सातारा : एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वृध्दाला पेटवून देत जिवे मारल्याने सोनगाव बंगला येथील एकाला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा न्यायालयात सुनावण्यात आली. अंकुश दाजी चव्हाण (वय ६०) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १६ सप्टेंबर २०१५ रोजी सायंकाळी साडेपाचच्यासुमारास फलटण तालुक्यातील सोनगाव बंगला येथे ही घटना घडली होती. बाबासाहेब केशव भोसले (रा. सोनगाव बंगला) हे वृध्द गावातील एका दुकानासमोरील बाकड्यावर बसले होते. त्यावेळी आरोपी अंकुश चव्हाण याने एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातील रागातून पाठीमागून जात भोसले यांच्या अंगावर कॅनमधील रॉकेल ओतून पेटवून दिले होते. यामध्ये बाबासाहेब भोसले हे गंभीररित्या जखमी झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांनी तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्याचा निकाल मंगळवारी लागला. विशेष न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांनी आरोपी अंकुश चव्हाण याला खूनप्रकरणी जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. लक्ष्मण खाडे यांनी काम पाहिले, तर सरकार पक्षाने १३, तर बचाव पक्षातर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे, हवालदार शमशुद्दीन शेख, अमित भरते, राजेंद्र कुंभार यांनी सहकार्य केले.

हाफ फोटो दि.०९अंकुश चव्हाण आरोपी फोटो...

................................................

Web Title: One was sentenced to life imprisonment for burning an old man to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.