बामणोलीच्या बोट मालकांची चाललीय उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:37 AM2021-05-26T04:37:59+5:302021-05-26T04:37:59+5:30

बामणोली : बामणोलीसह तापोळा येथे जलसफारीसाठी बोटिंग व्यवसाय महत्त्वाचा भाग बनला आहे. यावर्षीच्या दिवाळी हंगामात तर इटली, जपान, ...

Ongoing starvation of Bamnoli boat owners | बामणोलीच्या बोट मालकांची चाललीय उपासमार

बामणोलीच्या बोट मालकांची चाललीय उपासमार

Next

बामणोली : बामणोलीसह तापोळा येथे जलसफारीसाठी बोटिंग व्यवसाय महत्त्वाचा भाग बनला आहे. यावर्षीच्या दिवाळी हंगामात तर इटली, जपान, स्पेन येथील पर्यटकांनी या मिनी काश्मीरला भेट देऊन ‘अमेझिंग प्लेस’ असे येथील निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले होते. हिरवागार निसर्ग व शिवसागर जलाशयाचे मनमोहक दृश्य अनेकांना मोहित करत असते. जलसफारीसाठी तापोळा व बामणोलीला पाच बोट क्लब आहेत. त्यांच्या मोटर लाँच, स्पीड बोट, पेंडल बोट, रोईंग बोट तसेच स्कूटर यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एकही पर्यटक नसल्याने तीन महिन्यांपासून बोट पाण्यात बांधलेल्या आहेत. त्यामुळे मालकांची उपासमार सुरू आहे.

या बोट मालकांना दररोज नदीकिनारी जाऊन बोटीत येणारे पाणी काढावे लागत आहे. तसेच पाण्याची पातळी सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे दररोज तीन ते चार फुटांनी घटत आहे. त्यामुळे दररोज सकाळी नदीबाहेर कोरड्या जागेत असणारी बोट पाण्यात ढकलावी लागत आहे. त्यामुळे दररोज ही अनावश्यक धडपड करावी लागत आहे. अनेक बोट मालकांनी आपल्या बोटी आतापासूनच पाण्यातून बाहेर काढून कोरड्या पात्रात ओढून ठेवण्यास सुरुवात केली आहे. दोन वर्षांपूर्वी मे महिन्यातच नदी पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे बोट चालकांचा चार महिन्याचा व्यवसाय बुडाला होता. परंतु यावर्षी पाणी जास्त असूनही केवळ कोरोना संकटामुळे पर्यटक नाहीत व धंदा नाही. त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज व कर्जाचे हप्ते कसे फेडायचे या चिंतेत बोट मालक आहेत. बोटी बाहेर काढून ठेवलेल्याच बऱ्या या निर्णयाप्रत अनेक बोट मालक आले आहेत

कोट

दोन वर्षांपूर्वी नदीपात्र कोरडे पडले होते. यावर्षी नदीत पाणीही जास्त आहे. वासोट्यामुळे धंदाही चांगला होत होता. परंतु लॉकडाऊनमुळे पंधरा दिवस दररोज नदीकाठी जाऊन बोटीतील पाणी काढणे व लाँच पाण्यात ढकलणे एवढेच काम करावे लागत आहे. कर्जाचे हप्ते आता कसे फेडायचे हाच प्रश्न आहे. बोट पाण्यातून बाहेर ओढून ठेवली आहे

- आनंदा भोसले,

बोट मालक, मुनावळे ता. जावळी

फोटो २५बामणोली बोटिंग

बामणोली येथील शिवसागर जलाशयाकाठी तीन महिन्यांपासून बोटी उभ्या आहेत. त्यामुळे मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. (छाया : लक्ष्मण गोरे)

Web Title: Ongoing starvation of Bamnoli boat owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.