ग्राहकांपाठोपाठ कांद्याने आता शेतकऱ्यांनाही रडवले!

By admin | Published: November 29, 2015 11:39 PM2015-11-29T23:39:56+5:302015-11-30T01:17:41+5:30

दर कोसळले : शेतकऱ्यांची चिंता वाढली; ढगाळ हवामान, अवकाळी पावसाचा फटका

Onion, after the customers, is crying for farmers too! | ग्राहकांपाठोपाठ कांद्याने आता शेतकऱ्यांनाही रडवले!

ग्राहकांपाठोपाठ कांद्याने आता शेतकऱ्यांनाही रडवले!

Next

राहिद सय्यद-- लोणंद--ढगाळ हवामान व अवकाळी पाऊस असे दुहेरी अस्मानी संकट कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर ‘आ’ वासून उभे असतानाच दिवाळीनंतर चार-पाच हजार रूपये प्रति क्विंटलवरून कांद्याचे दर एक-दोन हजार प्रतिक्विंटलवर कोसळले असून कांद्याच दरातील घसरणीचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च देखील निघत नसल्याने ग्राहकांना दीपावलीपूर्वी रडविणाऱ्या कांद्यामुळे आता कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे.चालू कांदा उत्पादन हंगामामध्ये पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे कांदा उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपर्यंत राज्यामध्ये ३४,४७८ हेक्टर म्हणजेच फक्त २८ टक्के कांदा लागवड झाली होती. उत्पादनामध्येच मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हंगामाच्या सुरुवातीलाच कांदा उत्पादकांना कांद्यास सोन्याचा भाव मिळू लागला होता.
कांद्याच्या दराने बाजार समित्यांमध्ये ६४०० रूपयांपर्यंत विक्रमी मजल मारली होती. तर किरकोळ बाजारात कांदा ८० रूपये किलोपर्यंत दिवाळीपूर्वी विकला जात होता. नेहमी कोसळणारे कांद्याचे दर, अवकाळी पाऊस व ढगाळ हवामानाचा कांदा उत्पादकांना बसणारा फटका, सरकारचे कांदा आयात-निर्यात धोरण, वाढती शेतमजुरी आदी बाबींचा नेहमीच कांदा उत्पादकांना फटका बसतो. त्यामुळे कांदा उत्पादक कांदा उत्पादनाकडे पाठ करून इतर पिकांकडे वळले आहेत. गेल्या हंगामामध्ये समाधानकारक पावसामुळे एक लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आली होती. राज्यामध्ये खरीप कांद्याचे (लाल हळदी), सरासरी १ लाख २३ हजार ६२३ हेक्टर क्षेत्र आहे. एका आठवड्यात कांद्याचे दर दीड ते दोन हजार रूपयांनी कोसळले असून उत्पादन व लागवड कमी असताना देखील अनपेक्षितपणे एवढे दर कोसळल्याने कांदा उत्पादकांना याचा मोठा फटका बसत आहे. कांद्याची लागवड व उत्पादन कमी झाल्याने कांदा ग्राहकांना गेली दोन महिने रडवित होता तोच आता उत्पादकांनादेखील रडविताना दिसत आहे. पुढील काळात नेमकी कांद्याच्या दराची काय स्थिती राहणार याबाबत कांदा उत्पादकांना चिंता लागली
आहे.


वातावरणातील अनियमितपणा व अनियोजित शेतीत घेण्याची पिके त्यामुळे कांद्याची आवक वाढली आहे. तसेच ढगाळ वातावरण व पावसाच्या भीतीने कांदा उत्पादकांनी जास्त प्रमाणात कांदा विक्रीला आणल्यामुळे दर कमी झाले आहेत. तरी पुढील एक दोन बाजारात दर स्थिर होऊन शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील.
- राजेंद्र तांबे, सभापती.

Web Title: Onion, after the customers, is crying for farmers too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.