लोणंदच्या बाजारात कांदा भडकला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 05:09 PM2017-08-06T17:09:43+5:302017-08-06T17:18:45+5:30
खडाळा : ‘लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आठवडा बाजारात गरव्या कांद्याचे दर प्रति क्विंटलला २६५० रुपयांपर्यंत भडकले आहेत. या बाजारात माण व पुरंदर तालुक्यातून आगाप लागवडीच्या हळव्या लाल कांद्याचीही आवक सुरू झाली आहे. या कांद्याचे दरही १९०० रुपयांपर्यंत तेजीत निघाले आहेत,’ अशी माहिती लोणंद बाजार समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनी दिली.

लोणंद बाजारात सध्या साठवणुकीच्या गरव्या कांद्याची आवक होत आहे. मात्र, या कांद्याची बाजारात होणारी आवक अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने कांद्याचे भाव भडकले आहेत. पुरंदर व माण तालुक्यातून हळव्या लाल आगाप लागवडीच्या कांद्याची आवक सुरू झाली असली तरी त्या कांद्याच्या आवकेचे प्रमाणही अत्यंत कमी असल्याने कांद्याचे भाव तेजीत निघत आहेत. यावेळच्या आठवडा बाजारात गरव्या व हळव्या लाल कांद्याच्या ५०० पिशव्यांची आवक झाली आहे.
लोणंद बाजारात गरव्या कांद्याबरोबर हळव्या लाल कांद्याला सध्या देशांतर्गत बाजारपेठांतून मागणी वाढू लागल्याने भाव तेजीत निघाले आहेत, असा दावाही लोणंद बाजार समितीच्या सूत्रांनी केला आहे.
कांद्याच्या प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव पुढीलप्रमाणे :
गरवा कांदा नंबर एक - २००० ते २६५० रुपये,
गरवा कांदा नंबर दोन - १२०० ते २०००,
गरवा कांदा गोल्टी - ७५० ते १२०० रुपये
हळवा लाल कांद्याचे भाव १४०० ते १९०० रुपयांपर्यंत तेजीत निघाले आहेत.