साताऱ्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच...पाच हजारांपर्यंत भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 12:20 PM2020-11-07T12:20:11+5:302020-11-07T12:21:37+5:30

onion, Market, Satara area सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असलीतरी दरात सतत घसरण सुरू आहे. जुन्या कांद्याला क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर निघाला. तर मागील आठवड्याच्या तुलनेत जुन्या कांद्यामागे दीड हजार तर नव्या कांद्याला ५०० रुपये कमी भाव निघाला.

Onion prices continue to fall in Satara ... Prices up to five thousand | साताऱ्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच...पाच हजारांपर्यंत भाव

साताऱ्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच...पाच हजारांपर्यंत भाव

googlenewsNext
ठळक मुद्दे साताऱ्यात कांद्याच्या दरात घसरण सुरूच...पाच हजारांपर्यंत भाव जुन्याला दीड तर नव्याला ५०० रुपये कमी निघाला दर

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याची आवक चांगली होत असलीतरी दरात सतत घसरण सुरू आहे. जुन्या कांद्याला क्विंटलला पाच हजारांपर्यंत दर निघाला. तर मागील आठवड्याच्या तुलनेत जुन्या कांद्यामागे दीड हजार तर नव्या कांद्याला ५०० रुपये कमी भाव निघाला.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव अशा अनेक तालुक्यांतून शेतीमाल येतो. दर गुरुवारी आणि रविवारी मालाची आवक अधिक राहते. गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे दर वाढू लागले होते. सातारा बाजार समितीतही कांद्याला क्विंटलला साडेसहा हजारांपर्यंत दर मिळाला होता. मात्र, व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीवर मर्यादा आणल्याने दर ढासळले. सध्याही दरात घसरण सुरूच आहे.

सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याची १४८ क्विंटलची आवक झाली. यामध्ये जुन्या कांद्याला क्विंटलला चार ते पाच हजार रुपये दर आला. तर नव्याला क्विंटलला दोन ते तीन हजार भाव मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत दरात चांगलीच घसरण झाली आहे. तर वांग्याची अवघी २० क्विंटल आवक झाली. तर १० किलोला ५५० ते ६५० रुपयादरम्यान दर मिळाला.

टोमॅटोची ७९ क्विंटल आवक होऊन १० किलोला दर २०० ते २८० रुपयांपर्यंत मिळाला. कोबीला ३०० ते ४०० रुपये दर निघाला. तर फ्लॉवरचा भाव कमी झाला. ५५ क्विंटलची आवक होऊन १० किलोला २५० ते ३५० रुपये दर मिळाला. तर दोडक्याला ३०० ते ३५० रुपये दर आला. दोडक्याच्या दरात घसरण झाली.

कारल्याला १० किलोला ३५० ते ४०० रुपये दर मिळाला. वाटण्याचाही दर तेजीत आहे. १० किलोला १३०० ते १५०० रुपये दर निघाला. तर पावट्याला १० किलोला ५०० ते ६०० रुपये भाव मिळाला. गवारला ४०० ते ५०० रुपये दर आला. शेवग्याला ८०० ते १ हजार रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीला १० किलोला ३०० ते ४०० रुपये भाव आला. हिरव्या मिरचीत तेजी आली आहे.


वांगी, शेवगा अन् वाटाणा तेजीत...

सातारा बाजार समितीत गुरुवारी कांद्याच्या दरात घसरण झाली असलीतरी वांगी, शेवगा अन् वाटाणा तेजीत आहे. गेल्या महिन्यापासून वांगी भाव खाऊ लागली आहेत. तर वाटाण्यालाही १५ हजार रुपयांपर्यंत क्विंटलला भाव मिळत आहे. शेवग्यालाही गेल्या काही दिवसांपासून दर मिळू लागलाय.

मेथी, कोथिंबिरचा भाव कमी...

अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याचे नुकसान झाल्यानंतर सध्या आवक बऱ्यापैकी होत आहे. बाजार समितीत गुरुवारी मेथीच्या २२०० पेंडीची आवक झाली. पेंडीला शेकडा दर ८०० ते १२०० रुपये मिळाला. तर कोथिंबिरची २५०० पेंडी आवक होऊन शेकडा भाव ५०० ते १ हजार रुपये मिळाला. तर मंडईत मेथी आणि कोथिंबिर पेंडी १० ते १५ रुपयांच्या पुढे मिळत होती. सध्या मेथी, कोथिंबिरचा भाव कमी झाला आहे.
 

Web Title: Onion prices continue to fall in Satara ... Prices up to five thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.