कांद्याचे रोपे बाजारात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:20+5:302021-01-25T04:39:20+5:30

वाहतूक अस्ताव्यस्त फलटण : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ...

Onion seedlings enter the market | कांद्याचे रोपे बाजारात दाखल

कांद्याचे रोपे बाजारात दाखल

Next

वाहतूक अस्ताव्यस्त

फलटण : येथील शहर व परिसरातून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

०००००००००

रस्ता चकाचक

सातारा : साताऱ्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते खराब झाल्याच्या, खड्डे पडल्याच्या तक्रारी येत असतात. मात्र सातारा-धावडशी रस्ता अतिशय चकाचक आहे. त्यामुळे धावडशीहून काही मिनिटांत नागरिक साताऱ्यात येत आहेत. या रस्त्याची देखभाल यापुढेही अशीच ठेवावी, अशी मागणी केली जात आहे.

-------

कणीस विक्रीतून रोजगार

महाबळेश्वर : सध्या शहरातील बाजारपेठेत ठिकठिकाणी मक्याच्या कणसाची विक्री केली जात आहे. यंदा पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यामुळे त्यातून तरुणांना मोठा रोजगार मिळाला. विविध पर्यटनस्थळावर ते भाजलेली कणसं विक्रीसाठी थांबत असतात.

-०००००००००

शाळांमध्ये साफसफाई

सातारा : कोरोनानंतर तब्बल दहा महिन्यांनंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत आहेत. मुलांना संसर्ग होऊ नये म्हणून शाळांमध्ये प्रवेशद्वारापासून साफसफाई केली जात आहे. यासाठी काही शाळांनी कर्मचारी नियुक्त केले आहेत.

००००००

कुत्र्यांची दहशत

सातारा : साताऱ्यातील मुख्य रस्त्यावर तसेच जुना मोटार स्टॅण्ड परिसरात कुत्र्यांचे टोळके मोठ्या प्रमाणावर फिरत असते. जकातवाडीतील घटना ताजी असल्याने सातारकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Web Title: Onion seedlings enter the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.