Satara: ऑनलाइन चुकून पैसे गेले; परत मागितले म्हणून दिली धमकी; महिलेवर गुन्हा दाखल 

By दत्ता यादव | Published: August 9, 2023 02:26 PM2023-08-09T14:26:03+5:302023-08-09T14:26:19+5:30

सातारा : शहरातील एका व्यक्तीकडून ऑनलाइन चुकून तीन हजार रुपये एका महिलेच्या अकाउंटवर गेले. हे पैसे परत देण्याची विनंती त्यांनी केली असता उलट ...

Online by mistake threatened to demand the return of lost money; A case has been registered against the woman | Satara: ऑनलाइन चुकून पैसे गेले; परत मागितले म्हणून दिली धमकी; महिलेवर गुन्हा दाखल 

Satara: ऑनलाइन चुकून पैसे गेले; परत मागितले म्हणून दिली धमकी; महिलेवर गुन्हा दाखल 

googlenewsNext

सातारा : शहरातील एका व्यक्तीकडून ऑनलाइन चुकून तीन हजार रुपये एका महिलेच्या अकाउंटवर गेले. हे पैसे परत देण्याची विनंती त्यांनी केली असता उलट त्यांनाच शिवीगाळ व धमकी देण्यात आली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलम चाैधरी (रा. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हुसेन मेहबूब शेख (वय ४०, रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा) यांच्याकडून चुकून ऑनलाइन तीन हजार रुपये एका अनोळखी नंबरवर गेले. त्यानंबर त्यांनी फोन केला असता हा नंबर नीलम चाैधरी यांचा असल्याचे त्यांना समजलं. शेख यांनी माझे पैसे तुम्हाला चुकून पाठवले गेले ते परत करा, असे सांगितले. 

मात्र, संबंधित महिलेने शेख यांना पैसे न देता शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकारानंतर शेख यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी संबंधित महिलेवर गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक माने हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Online by mistake threatened to demand the return of lost money; A case has been registered against the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.