ऑनलाईन शिक्षण अन् मोबाईल लावला मुलांना चष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:19+5:302021-07-17T04:29:19+5:30
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च २०२०पासून विद्यार्थ्यांची सुरू झालेली ऑनलाईन शाळा अद्यापही जैसे थे परिस्थितीतच आहे. ग्रामीण भागापेक्षा ...
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च २०२०पासून विद्यार्थ्यांची सुरू झालेली ऑनलाईन शाळा अद्यापही जैसे थे परिस्थितीतच आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरामध्ये शाळेच्या वर्गाबरोबर अन्य ऑनलाईन वर्ग सुरू असल्याचे विद्यार्थ्यांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाईन शिक्षण मोबाईलवर घेतले जात असल्यामुळे मुलांवर याचा दूरगामी परिणाम होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालक विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लहान मुले आणि युवकांच्या डोळ्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. कोरोनाचे अनेक सामाजिक, आर्थिक परिणाम जाणवत असताना आरोग्याची संबंधित अनेक समस्था निर्माण झाल्या आहेत. ‘ऑनलाईन स्कूल’मुळे मुलांच्या आणि ‘वर्क फ्रॉम होम’मुळे मोठ्यांच्या डोळ्यांवर ताण निर्माण होत आहे. डोळ्यांना खाज सुटणे, सातत्याने पाणी येणे, डोळे लाल होणे, चष्मा नव्याने लागणे किंवा पहिल्यापासून असलेला नंबर वाढणे अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. ‘मायोपिया’अर्थात जवळची वस्तू बघण्यात अंधूक दिसण्याची समस्या वाढू लागल्या आहेत.
चौकट..
डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून..
-संगणक स्क्रीनवर ॲँटिग्लेयर काच बसवावी
-प्रत्येक ऑनलाईन तासिकेनंतर डोळे बंद ठेवून डोळ्यांना आराम द्या
- ॲंटिग्लेयर चष्मा वापरावा
-डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करणेही आवश्यक असते.
-जीवनसक्तयुक्त आहार नियमित, नियमित व्यायाम आणि मोबाईल फोनचा मर्यादित वापरामुळे डोळ्यांची समस्या दूर होऊ शकते.
-जास्तीत जास्त फळांचे सेवन करा
(कोट..)
संगणक आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये डोकेदुखी, डोळ्यांतून पाणी येण्याचे प्रकार वाढले आहेत. अशावेळी पालक मुलांना पटकन आराम मिळावा, यासाठी घरात उपलब्ध असलेले ड्रॉप वापरतात किंवा मेडिकल स्टोअरमधून आणलेली औषधे मुलांना देतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारे उपचार घेणे धोकादायक ठरू शकते.
डॉ. श्रीराम भाकरे, नेत्रतज्ज्ञ
लहान मुलांमध्ये डोकेदुखी वाढली
-आठ मिनिटांपेक्षा अधिक व्हिडिओ बघू नये ते डोळ्यांसाठी घातक
-मुलांनी एक तास व्हिडिओ पाहिल्यानंतर काहीकाळ आराम गरजेचा
-प्रत्येक तासिकानंतर डोळे बंद ठेवून आराम घ्यावा.
(कोट..)
भ्रामक विश्वात भटकंती
ऑनलाईन पाहण्यामुळे मुलांच्या डोळ्यावर अतिताण येत आहे. याशिवाय ती ऑनलाईन यूट्यूबसह इतर वेबसाईट पाहण्याची वेळ घालवत आहेत. त्याचा परिणामही मुलांवर होत आहे. बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात बदल झाले आहेत. त्यांना भ्रामक जगात जगण्याची सवय लागल्याचेही आढळून आले आहे.
-डॉ.
कोट..
सध्या मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मुलगी लहान असल्यामुळे तिला ऑनलाईन शिकवलं जातंय. त्याचे आकलन होत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा यूट्यूबवर व्हिडिओ बधून तिचा अभ्यास घ्यावा लागतो. त्यामुळे तिचा स्क्रीन टाइम वाढला आहे.
-ज्ञानेश्वरी निकम, विसावा नाका
कोट..
ऑनलाईन शिक्षणाची सवय नसल्याने मुलांना अभ्यास समजण्यात अद्यापही अडचण येतेय. घरी बसून शिक्षण घेण्याचा फायदा कमी; पण तोटा जास्त होतोय. प्रत्येक मुलाचं स्क्रीन टाइम तर वाढलं. पण मोबाईल वापरण्याची त्यांची सवयी घातक ठरू पाहतेय.
-चेतन शहा, राजपथ