महिलेची ६७ हजारांची ऑनलाईन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:04+5:302021-01-02T04:55:04+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील स्मिता गुणकी यांनी २००९ मध्ये बँक ऑफ इंडिया, शाखा मलकापूर येथे त्यांच्या नावे बचत ...

Online fraud of Rs 67,000 for a woman | महिलेची ६७ हजारांची ऑनलाईन फसवणूक

महिलेची ६७ हजारांची ऑनलाईन फसवणूक

Next

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील स्मिता गुणकी यांनी २००९ मध्ये बँक ऑफ इंडिया, शाखा मलकापूर येथे त्यांच्या नावे बचत खाते उघडले आहे. त्या खात्यातून त्यांचा दर महिन्याला गृहकर्जाचा हप्ता कापून जात होता. त्यांनी खात्यातून ऑनलाईन बँकिंग पेटीएमद्वारे व्यवहार केल्यास त्यांना मोबाईल मेसेज येत असतो. मार्च २०२० पासून त्यांनी त्यांच्या खात्यात पैसेसुद्धा भरलेले नाहीत. १३ ऑक्टोबर २०२० रोजी स्मिता यांचे पती रवींद्र गुणकी यांनी स्मिता यांच्या बचत खात्यात २ लाख रुपये भरले. त्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी व १६ ऑक्टोबर रोजी २ लाख ४ हजार ५०० व ९८ हजार १७४ असे इन्शुरन्ससाठी कापून गेले. तसेच स्मिता यांनी ३० ऑक्टोबर २०२० रोजी टोलनाका रिचार्जसाठी ४८५ रुपये तसेच गृहकर्जाचा हप्ता १७ हजार १३३ कापून गेला. त्यावेळी त्यांच्या बचत खात्यात ५१ हजार ६५७ रुपये शिल्लक राहिले होते. त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी मनोहर सोलंकी यांनी घरभाडे म्हणून ११ हजार रुपये स्मिता यांच्या खात्यात भरले. त्यावेळी त्यांच्या खात्यात १३ हजार १४९ रुपये शिल्लक रक्कम होती. १ डिसेंबर २०२० रोजी गृहकर्जाचा हप्ता १७ हजार १३० रुपये कापून जाण्याऐवजी १३ हजार १५० रुपये हप्ता कापून गेला. तसेच स्मिता यांच्या मोबाईलवर मेसेज आला की बचत खात्यात शिल्लक रक्कम नाही. त्यामुळे स्मिता यांनी खात्यातील रक्कम कोठे गेली, याबाबत चौकशी केली असता, २६ ऑक्टोबरपासून ३० नोव्हेंबरपर्यंत पेटीएमद्वारे अज्ञाताने त्यांच्या खात्यातून ६७ हजार ५८५ रुपये काढून फसवणूक केल्याचे लक्षात आले. याबाबत स्मिता गुणकी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Online fraud of Rs 67,000 for a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.