सातारा जिल्ह्याच्या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे ऑनलाईन उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 02:18 PM2020-09-30T14:18:30+5:302020-09-30T14:24:05+5:30

सातारा जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल मंत्रालयात ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

Online launch of Satara District Patient Management System | सातारा जिल्ह्याच्या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे ऑनलाईन उद्घाटन

सातारा जिल्ह्याच्या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे ऑनलाईन उद्घाटन

Next
ठळक मुद्देसहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन covid19satara.in लिंकवर मिळणार माहिती

सातारा  : सातारा जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णांसाठी केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. या रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते काल मंत्रालयात ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कोविड-१९ मुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत, ही केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली असून covid19satara.in  या लिंक द्वारे रुग्णालयातील बेड ची माहिती उपलब्ध होणार आहे.

एखाद्या तालुक्यात बेड उपलब्ध नसेल तर दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात बेड उपलब्ध आहे का नाही याची माहिती मिळू शकते आणि बेड आभावी उपचार न मिळण्याच्या अडचणी दूर होण्यास मदत होईलअसेही  पाटील यांनी सांगितले.

यावेळी कोरी रोशन सोल्युशन एलएलपी चे व्यवस्थापकीय संचालक मोहित तोडकर यांनी याचे सादरीकरण केले. याबद्ल काही अडचण आली तर टोल फ्री क्रमांक 1077 हा सुध्दा उपलब्ध करून दिला आहे.

Web Title: Online launch of Satara District Patient Management System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.