शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मिळणार आॅनलाईन धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 09:22 PM2020-03-20T21:22:35+5:302020-03-20T21:23:23+5:30
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्र रंगवा या उपक्रमांतर्गत वयोगटानुसार कला विषय असलेल्या शिक्षकांनी रोज एक चित्र उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांना घरी बसून करात येतील, असे वर्गनिहाय कार्यानुभवाचे उपक्रम द्यावेत.
सातारा : जिल्'ातील सर्व शाळांना सुटी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या या कालावधीचा सदुपयोग व्हावा, या उद्देशाने शिक्षण विभाग सक्रिय झाले आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये यासाठी शाळा आणि शिक्षकांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्कात राहावे, तसेच अभ्यास खेळ आदींबाबत सूचना द्यावेत, असा आदेश माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी परिपत्रकाद्वारे काढला आहे.
यात नमूद करण्यात आले आहे की, ‘पालकांसाठी वर्गनिहाय व्हॉट्सअॅप ग्रुप करावेत. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुटीच्या काळातील अभ्यासाचे वेळापत्रक पालकांना द्यावे. रोज कोणत्या विषयाचा व कोणकोणत्या घटकाचा अभ्यास करावा याची ग्रुपच्या माध्यमातून कल्पना द्यावी. आठवड्यातून एकदा छोट्या स्वरुपातील साव चाचणी विषयनिहाय द्यावी. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्र रंगवा या उपक्रमांतर्गत वयोगटानुसार कला विषय असलेल्या शिक्षकांनी रोज एक चित्र उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांना घरी बसून करात येतील, असे वर्गनिहाय कार्यानुभवाचे उपक्रम द्यावेत. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी पीडीएफ स्वरुपात वयोगटानुसार शक्य असल्यास पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.’
वैयक्तिक स्वच्छता याविषयी ग्रुपवर माहिती देण्यात यावी, याबाबतही सूचित करण्यात आले. त्याबरोबरच नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम उपक्रम एकमेकांना श्ेअर करावेत. घर बसल्या कोणते उपक्रम राबवता येतील याची माहिती द्यावी. टीव्ही व मोबाईलापासून विद्यार्थ्यांनी दूर करण्यासाठी मनोरंजनात्मक बैठे खेळ सुचवावेत. हा उपक्रम करताना कोणावरही सक्ती करू नये. विद्यार्थी अभ्यासग्न राहतील, यासाठी घरबसल्या जे उपक्रम करता येतील ते देण्याचा प्रयत्न करावा, तसेच या उकप्रमासाठी शाळेतील शिक्षकांचे सहाय्य घेतले, तरी कोणत्याही प्रकारची हरकत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.