कोळकी ग्रामपंचायतीची सोमवारी ऑनलाईन सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:17+5:302021-05-28T04:28:17+5:30

कोळकी : फलटण शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या कोळकी ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवार, दि. ३१ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता ...

Online meeting of Kolaki Gram Panchayat on Monday | कोळकी ग्रामपंचायतीची सोमवारी ऑनलाईन सभा

कोळकी ग्रामपंचायतीची सोमवारी ऑनलाईन सभा

Next

कोळकी : फलटण शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या कोळकी ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोमवार, दि. ३१ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता ऑनलाईन होणार आहे. या ऑनलाईन ग्रामसभेत जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कोळकीचे उपसरपंच संजय कामठे यांनी केले आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याबाबतचे आदेश नुकतेच पारित केले होते. त्यानुसार या ऑनलाईन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामसभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करणे, सन २०२०-२१चा वार्षिक जमा-खर्च वाचन करणे, लेखापरीक्षण अहवालाचे वचन करणे, १५ वित्त आयोग सन २०२१-२२च्या आराखड्याला दुरुस्तीसह मान्यता देणे, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२१-२२साठी पुरवणी लेबर बजेट तयार करून मान्यता घेणे, महाराष्ट्र ग्राम समृद्ध योजनेचा पुरवणी आराखडा तयार करून योजनेंतर्गत लाभार्थी निवड करणे, कोविड १९ परिस्थितीचा आढावा घेणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे या योजनेमध्ये शासन निर्णयाप्रमाणे राहिलेल्या वस्त्यांचा पुरवणी आराखडा तयार करणे, सामाजिक लेखापरीक्षण करणे, सांडपाणी घनकचरा आराखड्याला मान्यता देणे, संभाव्य पाणीटंचाईबाबत चर्चा करणे, १५ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०२०-२१ची कामे सुरू करणे, ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे, हे विषय घेतले जाणार आहेत.

Web Title: Online meeting of Kolaki Gram Panchayat on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.