मायणीच्या शाळेत ऑनलाईन महिला दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:34 AM2021-03-14T04:34:27+5:302021-03-14T04:34:27+5:30
मायणी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मायणी (मुले) येथे महिला दिनानिमित्त दिनांक ८ ते १२ मार्च यादरम्यान ऑनलाईन महिला ...
मायणी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मायणी (मुले) येथे महिला दिनानिमित्त दिनांक ८ ते १२ मार्च यादरम्यान ऑनलाईन महिला दिन सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहामध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध महिलांची चर्चासत्र आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये डॉ. सुप्रिया साळुंखे-कदम यांनी ‘मुला-मुलींचे मानसिक स्वास्थ्य : काळाची गरज’, रंजना श्रीमंत सानप यांचे ‘स्त्री जीवनावर आधारित प्रेरणादायी कविता’, ‘महिला साक्षरता व कुटुंब विकास’, वर्षा विक्रांत येवले-गुदगे, पूजा कुलकर्णी (राज्यस्तरीय खो-खो खेळाडू ) व काजल आटपाडकर (राष्ट्रीय हॉकी खेळाडू) या गुणवंत खेळाडूंनी खेळांचे जीवनातील स्थान, यश, प्रा. कविता म्हेत्रे यांनी ‘स्त्री काल, आज आणि उद्या’ या विषयांवर मार्गदर्शन केले.
या सप्ताहाचे नियोजन रामचंद्र जगताप यांनी केले. यासाठी मुख्याध्यापिका उमा वडगावकर, अलका पिसाळ, मैथिली देशपांडे, वैशाली कालेकर, विजया सणगर, जयश्री निकम, वैशाली कांबळे यांचे सहकार्य मिळाले. पूर्व घाडगेमळा शाळेच्या प्रांजली नलवडे यांनीही मार्गदर्शन व सहकार्य केले.