‘तुम्ही गाडी कोणाकडून खरेदी केली ; विकल्या परस्पर ४४ नव्या गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 07:34 PM2019-12-27T19:34:09+5:302019-12-27T19:38:26+5:30

शोरूममध्ये गाड्या खरेदी करण्यासाठी येणा-या नागरिकांना भेटून तो परस्पर कागदपत्रांमध्ये फेरफार करत होता. त्यानंतर गोदामातील गाड्या तो नागरिकांना विकत होता. दरम्यान, शोरूममध्ये गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी एक युवक शुक्रवारी आला होता. त्यावेळी

Only 3 new trains sold by the worker | ‘तुम्ही गाडी कोणाकडून खरेदी केली ; विकल्या परस्पर ४४ नव्या गाड्या

‘तुम्ही गाडी कोणाकडून खरेदी केली ; विकल्या परस्पर ४४ नव्या गाड्या

Next
ठळक मुद्देशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : २३ लाख २५ हजारांचा अपहार

सातारा : येथील कणसे होंडा शोरूममधील कामगारानेच तब्बल ४४ नव्या दुचाकी कादपत्रांमध्ये फेरफार करून परस्पर विकल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी उघडकीस आली. या प्रकरणी शशिकांत चांगदेव नलवडे (रा. धनगरवाडी, पो. कोडोली, सातारा) या कामगारावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये कणसे होंडा शोरूम आहे. या शोरूममध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी शशिकांत नलवडे हा काम करत होता. शोरूममध्ये गाड्या खरेदी करण्यासाठी येणा-या नागरिकांना भेटून तो परस्पर कागदपत्रांमध्ये फेरफार करत होता. त्यानंतर गोदामातील गाड्या तो नागरिकांना विकत होता. दरम्यान,  शोरूममध्ये गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी एक युवक शुक्रवारी आला होता. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या कागदपत्र आणि चेशीज नंबरवरून शोरूममधील कर्मचा-यांना शंका आली. ‘तुम्ही गाडी कोणाकडून खरेदी केली,’ असे कर्मचा-यांनी विचारले. त्यावेळी त्याने नलवडेचे नाव सांगितले. त्यानंतर शोरूममधील व्यवस्थापकांनी गोदामातील गाड्या मोजल्या असता त्यामध्ये ४४ गाड्या नसल्याचे समोर आले.

आपल्याच कामगाराने मोठी अपरातफर केली असल्याचे समजताच शोरूममध्ये मोठी खळबळ उडाली. सर्व्हिसिंग करण्यासाठी आणलेली गाडी शोरूममध्येचा ताब्यात घेण्यात आली. परंतु अद्याप ४३ गाड्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे व्यवस्थापक संग्राम संभाजीराव माने (वय ३९, रा. गोडोली) यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. रात्री उशिपर्यंत शशिकांत नलवडे याला अटक झाली नव्हती.

Web Title: Only 3 new trains sold by the worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.