लग्न समारंभात १०० नव्हे ५० लोकांनाच परवानगी : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:39+5:302021-03-04T05:14:39+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमित रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारित ...

Only 50 people allowed in wedding ceremony: Collector | लग्न समारंभात १०० नव्हे ५० लोकांनाच परवानगी : जिल्हाधिकारी

लग्न समारंभात १०० नव्हे ५० लोकांनाच परवानगी : जिल्हाधिकारी

Next

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणू संशयित अथवा संक्रमित रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी लग्न समारंभाबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार लग्न समारंभाच्या कार्यात जास्तीत जास्त ५० व्यक्तींनाच (भटजी, वाजंत्री, स्वयंपाकी, वाढपीसह) उपस्थित राहण्याबाबत परवानगी राहील.

लग्न समारंभाच्या अगोदर लग्न कार्याच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पोलीस स्टेशन यांचा ना हरकत परवाना घेऊन संबंधित तहसीलदार यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. फक्त मंगल कार्यालयामध्ये (हॉलमध्ये) सनई-वाद्यास परवानगी राहील. याव्यतिरिक्त ज्या ठिकाणी लग्नकार्य आहे, अशा मंगल कार्यालयाच्या बाहेरील परिसरात अथवा आवारात कोणत्याही प्रकारचे बॅन्जो-बँड, डीजे अथवा फटाके वाजविण्यास पूर्णपणे मनाई राहील. संपूर्ण लग्न समारंभात वधू व वर या दोन्ही पक्षाकडील आणि उर्वरित सर्व नागरिकांना पूर्णवेळ मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहील.

मंगल कार्यालय व्यवस्थापनाने लग्न कार्यालयात पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. लग्न समारंभास ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती (मधुमेह, रक्तदाब, श्वसनाचे विकार) व्यक्तीस लग्न कार्यात सहभागी होण्यास मनाई करण्यात येत आहे. तथापी सख्ख्या रक्त नात्यातील आजी व आजोबा इत्यादींना उपस्थित राहण्यास परवानगी राहील. हॉटेल, लॉन्स, मंगल कार्यालये इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कोविड-१९ चे अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाचा भंग केल्यास संबंधित व्यवस्थापन यांच्याकडून प्रथमवेळी २५ हजार रुपये दंड तसेच दुसऱ्या वेळी भंग झाल्यास १ लाख व फौजदारी कारवाई करण्यात येईल व संबंधित कार्यक्रम आयोजकांकडून १० हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

Web Title: Only 50 people allowed in wedding ceremony: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.