अवघ्या गावाने पुरविले अकरा सुनांचे डोहाळ

By admin | Published: March 23, 2015 10:46 PM2015-03-23T22:46:03+5:302015-03-24T00:19:04+5:30

भुयाचीवाडीमध्ये सामुहिक ओटीभरण : आरोग्यविषयक मार्गदर्शन अन् वेगवेगळ्या चवीचे खाद्यपदार्थ े

Only eleven heard of the villain | अवघ्या गावाने पुरविले अकरा सुनांचे डोहाळ

अवघ्या गावाने पुरविले अकरा सुनांचे डोहाळ

Next

उंब्रज. : स्त्री गर्भवती असली की अवघे घर व्याकुळ असते चिमुकल्याला कवेत घेण्यासाठी आणि लाड करण्यासाठी. या आनंदाच्या काळात गर्भवतीच्या तोंडून येणारी प्रत्येक फरमाईश पुरवायची हा घरातील अलिखित नियमच जणू. भुयाचीवाडी गावाने मात्र गावातील ११ गर्भवती महिलांच्या एकत्रित डोहाळे जेवणाचा उपक्रम राबविण्यात आला.
भुयाचीवाडी, ता. कऱ्हाड येथील अंगणवाडीत हा कार्यक्रम झाला. महिलांनी विविध खाद्यपदार्थ बनवून आणले होते. गर्भवती महिलांचे ओटीभरण ग्रामपंचायत सदस्या, शिक्षिकांनी केले. महिलांना गर्भ धारणेच्या काळातील आहार, औषधे व व्यायाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविका सुनिता चव्हाण, विजया सूर्यवंशी, कोमल मदने, आरोग्य सेविका अर्पिता देसाई, ग्रामसेविका रोहिणी जंगम, अलका यादव, शोभा गानबावले, छाया शिंदे, वनिता शिंदे, मंदाकिनी सूर्यवंशी यांनी नियोजन केले होते. (प्रतिनिधी)

प्रत्येक घरातून खाद्यपदार्थाचे डबे
गावात होत असलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे या डोहाळे जेवण कार्यक्रमात प्रत्येक महिला आपल्याच घरातील कार्यक्रम असल्याचे समजून कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

आमच्या एकत्रित डोहाळे जेवणाचा उपक्रम अभिनव आहे. या कार्यक्रमात आमचे डोहाळे पुरवून आम्हाला आदर्श माता बनण्यासाठीही प्रबोधन करण्यात आले. याबाबत आम्ही आयोजकांचे आभारी आहोत.
- रूपाली शिंदे


कुपोषित बालक जन्माला आल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा ते बालक जन्मापूर्वीच सुदृढ होण्यासाठी या कार्यक्रमाचे आम्ही नियोजन केले. यातून माता व बालकांच्या आरोग्याची काळजी, आहार यांची माहिती देण्यात आली.
- सीमा कांबळे,
अंगणवाडी पर्यवेक्षिका

Web Title: Only eleven heard of the villain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.