किवळला मृदा आरोग्यपत्रिका प्रशिक्षणास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:26+5:302021-03-07T04:35:26+5:30
या प्रशिक्षणामध्ये जमिनीचे आरोग्य व सुपीकता टिकविणे आणि वाढविण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करून रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खते, जैविक ...
या प्रशिक्षणामध्ये जमिनीचे आरोग्य व सुपीकता टिकविणे आणि वाढविण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करून रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय खते, जैविक खते, सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या खतांचा वापर करणे, मातीचे रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्म, सेंद्रिय कर्बाचे महत्त्व व व्यवस्थापन याविषयी कालवडेच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ भरत खांडेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच सुरेखा साळुंखे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून, त्याकडे वळण्याचे आवाहन केले. माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांनी शेतकऱ्यांनीही जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला. तसेच पंचायत समिती सदस्य शालन माळी यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कृषी सहायक संजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. उंब्रजचे मंडल कृषी अधिकारी रवी सुरवसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक राजेंद्र चव्हाण, किसन वाघमोड, कृषी सहायक पृथ्वीराज ऐटणे, सतीश रणपिसे, कैलास सूर्यवंशी, चंद्रकला चौधरी, वर्षा कणसे, प्रतीक्षा लिपारे, तृप्ती थोरात, नरेंद्र सावंत, तसेच कृषी मित्र सचिन साळुंखे, सुनील साळुंखे, अमोल मुळीक, संतोष साळुंखे, आदी उपस्थित होते.
फोटो : ०६केआरडी०४
कॅप्शन : किवळ (ता. कऱ्हाड) येथे शाश्वत शेती अभियान जमीन आरोग्यपत्रिका अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.