आपण सारे राष्ट्र‘वादी’ उदयनराजेंची एकीची साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 12:25 AM2019-03-19T00:25:25+5:302019-03-19T00:27:37+5:30

तालुका पातळीवर आपली स्वतंत्र फळी तयार करून त्याद्वारे राजकीय डावपेच खेळणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी आमदारांपुढे आता ‘आपण सारे राष्ट्रवादी’ म्हणत एकत्र येण्याची हाक दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी वरिष्ठ

The only simplicity of all the nationalist 'Udayanaraja' | आपण सारे राष्ट्र‘वादी’ उदयनराजेंची एकीची साद

आपण सारे राष्ट्र‘वादी’ उदयनराजेंची एकीची साद

googlenewsNext
ठळक मुद्देप्रत्येक आमदाराशी थेट संवादाचा प्रयत्नविधानसभेला पक्षहित जोपासण्यासाठी शब्द

प्रगती जाधव-पाटील ।
सातारा : तालुका पातळीवर आपली स्वतंत्र फळी तयार करून त्याद्वारे राजकीय डावपेच खेळणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी आमदारांपुढे आता ‘आपण सारे राष्ट्रवादी’ म्हणत एकत्र येण्याची हाक दिली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी वरिष्ठ पातळीवर केलेले मनोमिलन आमदारांसाठी आदेश आहे. उदयनराजेही या आदेशाचे पालन करून विधानसभेला पक्षहित जोपासण्याचा शब्द आमदारांना देत आहेत. अजून कोणीही थेट प्रतिक्रिया देत नाही तरी देखील सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा उदयनराजेंना विश्वास आहे.

शहकाटशह, तीव्र विरोध, कार्यक्रमावर बहिष्कार, कार्यकर्त्यांसह विरोधासाठी शक्तिप्रदर्शन आदी सर्व नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी वरिष्ठ पातळीवर मनोमिलन घडवून आणत उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली.

उमदेवारी जाहीर झाल्यानंतर पक्षादेश म्हणून सर्वच आमदारांनी उदयनराजे यांचे काम करण्याचं ठरवलं. याची सुरुवात कोरेगाव विधानसभा मतदार संघातून झाली. आमदार शशिकांत शिंदे यांनी पक्षाव्यतिरिक्त सहाय्य करणाऱ्या उदयनराजे यांना, ‘तुम्ही राज्यात जा जिल्ह्यात आम्ही तुमच्यासाठी खंबीर आहोत,’ असा शब्द दिला.
वाई मतदार संघात आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या फंदात काहीदा उदयनराजे यांच्याकडून आमदार मकरंद पाटील यांच्यावर अनाहुतपणे हल्ले होत होते. विरोधी उमेदवाराला गाडीत घेऊन फिरणं असो वा ‘तुम्ही करा रे कोण आडवतं बघातोच मी,’ अशी गर्जना करणं असो, या बाबींमुळे दुखावलेल्या आ. पाटील यांना दुसºया पाटलांच्या घरात ‘आपण एकच’ हा शब्द उदयनराजे यांनी दिला.

कºहाड उत्तर मतदार संघात आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात असलेल्या भाजपाचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्याशी वाढलेली सलगी त्यांची डोकेदुखी ठरत होती. याविषयी आ. पाटील यांनी कधीच कुठेही जाहीर वाच्यता केली नसली तरीही ते दुखावलेले होतेच. उदयनराजे यांच्या कºहाड दौºयात त्यांनी पाटील यांची भेट घेतली. या भेटीतही ‘आपण एकत्र राहू’ अशी ग्वाही उदयनराजे यांनी दिली.

सातारा-जावळी मतदार संघात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याबरोबरचा त्यांचा वाद जिल्ह्याने पाहिला. त्याच्या झळा तर अगदी बारामतीपर्यंत पोहोचल्या; पण त्याचा शेवट थोरल्या पवारांनी गोडच केला. हे मनोमिलन झाल्यानंतर दोन्ही राजे एकत्र समोरासमोर आले नाहीतच; पण मुंबई येथील सभेत ‘मी आणि शिवेंद्रराजे, आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत,’ असे सांगून उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न केला.
पाटण मतदार संघात शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या कार्यक्रमांना उदयनराजेंनी आवजूुन उपस्थिती लावली. त्यामुळे पाटणकर गट नाराज झाला होता. ही नाराजी दूर करण्यासाठी गत सप्ताहात उदयनराजे यांनी पाटणकरांची वाड्यावर भेट घेतली. या भेटीत नातेसंबंधांबरोबरच सत्यजित पाटणकर यांच्याबरोबर एकाच वर्गात शिकत असल्याची आठवण करून देत त्यांनी त्यांनाही सोबत राहण्याची साद घातली. एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अद्याप थंडच आहे. त्यामुळे एकदाचा विरोधक ठरल्यानंतर रंगत वाढणार आहे.

सगळ्या पक्षात मित्र त्याला काय करू?
गत सप्ताहात सातारा औद्योगिक वसाहतीत उदयनराजे समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे आमंत्रण देताना कोण कोणत्या पक्षात आहे, हे बघू नका... ते उदयनराजे समर्थक आहेत, एवढा एकच निकष लावा, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे भाजपापासून अन्य स्थानिक पक्षांचे कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहिले होते. यावेळी आपल्या भाषणात उदयनराजे यांनी, ‘सगळ्या पक्षात माझे मित्र आहेत, त्याला आता मी काय करू,’ असा सवाल उपस्थित करून कार्यकर्त्यांना हसवलं होतं.

Web Title: The only simplicity of all the nationalist 'Udayanaraja'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.