ग्रामीण भागात केवळ ड्रॅगन फ्रूटची चर्चा, रक्तदाब, मधुमेह आजारांवर प्रतिबंधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 05:15 PM2017-12-13T17:15:44+5:302017-12-13T17:22:37+5:30
रक्तदाब, मधुमेह, शारीरिक पेशींचा ऱ्हास यासारख्या आजारांना प्रतिकार करणारे फळ म्हणून ड्रॅगन फ्रूटचा बोलबाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजारात आता ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढू लागली आहे.
पिंपोडे बुद्रुक: रक्तदाब, मधुमेह, शारीरिक पेशींचा ऱ्हास यासारख्या आजारांना प्रतिकार करणारे फळ म्हणून ड्रॅगन फ्रूटचा बोलबाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजारात आता ड्रॅगन फ्रूटला मागणी वाढू लागली आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनपद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या मानसिक ताण-तणावामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा आजारांवर इतर विशेष उपचारांसह प्रतिबंधक उपाय म्हणून ड्रॅगन फ्रूट उत्तम पर्याय असल्याचे मानले जाते.
त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांकडून या फळाला चांगली मागणी आहे. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात देखील ड्रॅगन फ्रूटची आवक होत असून, त्याच्या मागणीत वाढ होत आहे.