जमिनीवर राहणारेच आकाशाला गवसणी घालतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:42 AM2021-09-27T04:42:24+5:302021-09-27T04:42:24+5:30

सुतारवाडी, ता. पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक सूर्यभान खंदारे यांच्या ‘मातीच्या गर्भातून’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ...

Only those who live on the ground explore the sky | जमिनीवर राहणारेच आकाशाला गवसणी घालतात

जमिनीवर राहणारेच आकाशाला गवसणी घालतात

Next

सुतारवाडी, ता. पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक सूर्यभान खंदारे यांच्या ‘मातीच्या गर्भातून’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

साहित्यिक प्रा. पी. एम. काटकर म्हणाले, कवी जन्माला येत नसतो तर तो अवतीभोवतीच्या समाजातून घडत असतो. मातीच्या गर्भातून या काव्यसंग्रहात खंदारे यांनी समाजातील सुख-दुखांची शब्दात प्रभावी गुंफण केलेली आहे.

यावेळी प्रा. डॉ. भीमराव वानोळे, विलास ऊर्फ लालासाहेब पाटील, रयत विज्ञान परिषदेचे सचिव व समन्वयक डॉ. सुधीर कुंभार यांची भाषणे झाली. सुतारवाडी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा माने उपस्थित होत्या. रमेश महाडिक यांनी प्रास्ताविक केले. राजू पवार यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो : २६केआरडी०२

कॅप्शन : सुतारवाडी, ता. पाटण येथील शिक्षक सूर्यभान खंदारे यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रा. दादाराम साळुंखे, डॉ. सुधीर कुंभार, डॉ. भीमराव वानोळे, पी. एम. काटकर, सुलभा माने यांच्या हस्ते झाले.

Web Title: Only those who live on the ground explore the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.