सातारा पालिकेच्या दीड वर्षांत केवळ तीनच सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:43 AM2021-07-14T04:43:38+5:302021-07-14T04:43:38+5:30

सातारा : कोरोनामुळे सातारा पालिकेची आर्थिक घडी विस्कटली असताना आता विकासकामांवरही काहीसा परिणाम होऊ लागला आहे. गेल्या दीड वर्षांच्या ...

Only three meetings of Satara Municipality in a year and a half | सातारा पालिकेच्या दीड वर्षांत केवळ तीनच सभा

सातारा पालिकेच्या दीड वर्षांत केवळ तीनच सभा

Next

सातारा : कोरोनामुळे सातारा पालिकेची आर्थिक घडी विस्कटली असताना आता विकासकामांवरही काहीसा परिणाम होऊ लागला आहे. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत सातारकरांच्या विकास कामांना मंजूरी देणाºया पालिकेच्या केवळ तीनच सर्वसाधारण सभा झाल्याने विकासकामांवर प्रचंड मर्यादा आल्या आहेत. आगामी सभेलाही अद्याप मुहूर्त न मिळाल्याने शहरविकासाचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबीत आहेत.

पालिका निवडणुकीचा साडेचार वर्षांचा कालावधीत पूर्ण झाला असून, आगामी निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आतापासून राजकीय पक्षांची निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सातारा पालिकेतील सत्तारुढ सातारा विकास आघाडीने आघाडी प्रमुख खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा वनननाम्याप्रमाणे विकास साधण्याचा पुरेपूर प्रत्यत्न केला आहे. ग्रेड सेपरेटर, कास धरण उंची, पालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, भुयारी गटार योजने, पंतप्रधान आवास योजना अशा महत्वाच्या कामांना त्यांनी गती दिली. मात्र, कोरोना संक्रमणामुळे गेल्या दीड वर्षांत पालिकेच्या केवळ तीनच सर्वसाधारण सभा झाल्याने विकासकामे मार्गी लावण्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत.

नगरपालिका अधिनियमाप्रमाणे पालिकेची महिन्याला एक सर्वसाधारण सभा होणे अपेक्षित आहे. मात्र, जानेवारी २०२० ते जुलै २०२१ या दीड वर्षांच्या कालावधीत झालेल्या दहा सभांपैकी केवळ तीनच सभा सर्वसाधारण होत्या. तर चार विशेष सभा या स्वीकृत नगरसेवक, सभापती व उपनगराध्यक्ष निवड तर एक विशेष सभा ही पालिकेच्या बजेट मंजूरीची होती. पालिकेची शेवटची आॅनलाईन सर्वसाधारण सभा दि. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली. तर दि. ८ एप्रिलची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. आता आगामी सभेलाही अद्याप मुहूर्त न मिळाल्याने विकासकामे मार्गी लावण्याचे सत्ताधाºयांपुढे आव्हान असणार आहे.

(चौकट)

अनेक कामे रखडली

जलतरण तलाव अद्ययावतीकरण, शहरातील मंडईचे प्रशस्तीकरण, रस्ता रुंदीकरण व पॅचिंग, पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचे फेरलिलाव, खुल्या जागांची भाडे निश्चिती, नवीन प्रशासकीय इमारत तसेच हद्दवाढीत नव्याने समाविष्ठ झालेल्या भागात मुलभूत सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. मात्र, सभाच होत नसल्याने ही विकासकामे मार्गी लावण्यावर मर्यादा आलेल्या आहेत.

लोगो : सातारा पालिका फोटो

Web Title: Only three meetings of Satara Municipality in a year and a half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.