‘कोयना’त सहा दिवसांत केवळ अडीच टीएमसी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 05:20 PM2017-08-06T17:20:12+5:302017-08-06T17:21:12+5:30
सातारा : अतिपावसाच्या सातारा जिल्ह्यात पाऊस लांब सुटीवर गेला आहे. सर्वत्र ऊन, पावसाचा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणात येणाºया पाण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. साहजिकच धरणात गेल्या सहा दिवसांमध्ये केवळ २.४६ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. धरणात सध्या ८५.९५ टीएमसी पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील महाबळेश्वर, कोयना, नवजा येथे चोवीस तासांत सरासरी शंभरहून मिलिमीटरहून अधिक पाऊस पडतो. पण या गावांमध्ये खूपच कमी प्रमाणात पाऊस पडत आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनेत केवळ ४, नवजामध्ये १३ तर महाबळेश्वरमध्ये ११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणात केवळ ७२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणात ८५.९७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या रविवारीच कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांनी उघडून पाणी सोडले जात होते. आत्ता पाऊस मंदावल्याने दरवाजे अन् पायथा वीजगृहातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
कोयनेतील गेल्या सहा दिवसांतील पाणीसाठा टीएमसीत
१ आॅगस्ट : ८३.५३
२ आॅगस्ट : ८४.११
३ आॅगस्ट : ८४.८६
४ आॅगस्ट : ८५.११
५ आॅगस्ट : ८५.८१
६ आॅगस्ट : ८५.९७