वाळू उपशाला नगराध्यक्षांचीच परवानगी !

By admin | Published: January 10, 2016 12:50 AM2016-01-10T00:50:55+5:302016-01-10T00:50:55+5:30

वाळू उपशाला नगराध्यक्षांचीच परवानगी ! नावेचीवाडी ठेका : वाई पालिकेचा ठराव नसतानाही परस्पर दाखला; जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘व्हॉट्सअ‍ॅप’द्वारे तक्रार येताच यंत्रणा खडबडून जागी

Only the Vice President of Sandal Uppal | वाळू उपशाला नगराध्यक्षांचीच परवानगी !

वाळू उपशाला नगराध्यक्षांचीच परवानगी !

Next

सागर गुजर ल्ल सातारा
सातारा : वाई शहरालगत कृष्णा नदी तीरावर असणाऱ्या नावेचीवाडी येथील वाळू उपसा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. येथून वाळू उपसा करण्यास वाई नगरपालिकेने नव्हे, तर चक्क नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी ‘ना हरकत दाखला’ दिला. नगराध्यक्षांच्या सहीचा हा ना हरकत दाखला ‘व्हॉटस अ‍ॅप’च्या माध्यमातून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यापर्यंत पोहोचल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार वाईचे नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी त्यांच्या लेटरपॅडवरून २३ जून २0१५ मध्ये हा दाखला दिला आहे. ‘मागणी केलेवरून दाखला देणेत येतो की, शेतजमीन रि. स. नं. १४६/२, नावेचीवाडी, वाई क्षेत्र व त्याशेजारील क्षेत्रामध्ये वाळू साठा आहे. तरी या क्षेत्रामधील वाळू साठा उपसणेकामी लिलाव पद्धतीने कृष्णा नदीमधील वाळू साठा उपसण्याबाबत नगरपरिषदेची हरकत नाही, हा ना हरकत दाखला दिला असे,’ हे या दाखल्यात नोंद करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या १२ मार्च २0१३ च्या अद्यादेशानुसार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत वाळू उपशाचा ठेका द्यायचा झाल्यास त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा ना हरकत दाखला घ्यावा लागतो. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ना हरकत असल्याचा विषय मंजूर करायचा असतो. शहर परिसरात पालिकेने सभा घेऊन हा विषय मंजूर करणे आवश्यक आहे.
दरम्यान, वाई पालिकेने असला कोणताही ना हरकत दाखला दिला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मग नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी स्वत:च्या लेटरपॅडवर असा दाखला देण्यामागे त्यांचा काय उद्देश होता?,
नावेचीवाडीतला वाळू उपसा तेथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या ठरावाने सुरू झाल्याचे जिल्हा गौण खनिज विभागाने स्पष्ट केले आहे. कृष्णा नदीवर ज्या ठिकाणी वाळू उपसा सुरू होता, तेथून वाई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा जॅकवेल जवळ आहे. उपशामुळे पाणी दूषित झाले. वाई शहरात काही दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

Web Title: Only the Vice President of Sandal Uppal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.