कासचा एक व्हॉल्व्ह उघडा : दोन दिवसाला दीड इंचाने पाणी पातळी खालावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 08:13 PM2018-02-20T20:13:26+5:302018-02-20T20:13:49+5:30

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाºया कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. तसेच सद्य:स्थितीत तलावात साडेपंधरा फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे.

Open a cast of the castle: Water level decreases by half an inch for two days | कासचा एक व्हॉल्व्ह उघडा : दोन दिवसाला दीड इंचाने पाणी पातळी खालावतेय

कासचा एक व्हॉल्व्ह उघडा : दोन दिवसाला दीड इंचाने पाणी पातळी खालावतेय

Next
ठळक मुद्देसध्या तलावात साडे पंधरा फूट साठा शिल्लक

पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाºया कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. तसेच सद्य:स्थितीत तलावात साडेपंधरा फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. कासचा एक व्हॉल्व्ह पूर्णत: उघडा पडला असून, पंधरा दिवसांपासून दुसºया व्हॉल्व्हमधून शहराला पाणी पुरवठा सुरू आहे. तलावात शिल्लक असलेला पाणीसाठा काटकसरीने वापरल्यास पावसाळ्यापर्यंत पुरणार आहे.

दरवर्षी कास तलावात २५ फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. गतवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान पंधरा फुटापर्यंत पाणीसाठा शिल्लक होता. यंदा आजमितीला ही पाणीपातळी साडेपंधरा फूट एवढी आहे. शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दोन दिवसाला दीड इंच पाणी पातळी खालावत आहे. गतवर्षीपेक्षा अर्धा फूट पाणीसाठा तलावात शिल्लक असला तरी वातावरणात दिवसा उष्णतेच्या तीव्रतेचे प्रमाण अधिकाधिक वाढत असल्याने पाणी पातळी खालावत आहे. हा पाणीसाठा पावसाळ्यांपर्यंत टिकून राहावा, यासाठी तलावातून मुरून वाया जाणारे पाणी विद्युत मोटारीच्या सा'ाने उपसा करून पाटात सोडले जात आहे.


गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धा फूट जादा साठा

एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाºया कास तलावातील एक व्हॉल्व्ह उघडा पडला असून, सध्या दुसºया व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. साधारण एप्रिल महिनाअखेरीस दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडतो. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अर्धा फुटाने पाणीसाठा जास्त शिल्लक आहे.



सध्या कास तलावात पंधरा फूट सहा इंच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.

- जयराम कीर्दत, पाटकरी कास तलाव


 

 

Web Title: Open a cast of the castle: Water level decreases by half an inch for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.