सातारा तालुक्यात फ्यूज बॉक्स उघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:21+5:302021-06-25T04:27:21+5:30

सातारा : सातारा तालुक्यातील अनेक गावांमधील फ्यूज बॉक्स उघड्या अवस्थेत आहेत. त्याच्या शेजारीच मानवी वस्ती असून, भोवतालीच लहान मुलं ...

Open fuse box in Satara taluka | सातारा तालुक्यात फ्यूज बॉक्स उघडे

सातारा तालुक्यात फ्यूज बॉक्स उघडे

Next

सातारा : सातारा तालुक्यातील अनेक गावांमधील फ्यूज बॉक्स उघड्या अवस्थेत आहेत. त्याच्या शेजारीच मानवी वस्ती असून, भोवतालीच लहान मुलं खेळत असतात. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून उघड्या फ्यूजबॉक्सला दरवाजे बसवावेत, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांतून केली जात आहे.

000000000

बसस्थानकासमोर वाहनांची रांग

सातारा : बसस्थानकात जाणाऱ्या गाड्या दोन्ही गेटमधून जात आहेत. त्याचवेळी बसस्थानकातून बाहेर येणाऱ्या गाड्याही गेटमध्ये आल्यास वाहतुकीची कोंडी होत असते. बसस्थानकात जाणाऱ्या व बाहेर येणाऱ्या वाहनांची शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

0000000

डांबरीकरणामुळे राजवाडा चकाचक

सातारा : साताऱ्यातील राजवाडा परिसरात गोलबागेभोवती डांबरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसर चकाचक झाला आहे. या ठिकाणाहून वाहने सुसाट धावत आहेत. पाऊस पडल्यानंतर तर हा रस्ता स्वच्छ धुवून निघत असतो. त्यावर सायंकाळच्या वेळेला परावर्तीत यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर दिसायलाही छान दिसत असतो. मात्र मंगळवार तळे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

00000000

साताऱ्यातील रस्त्यावर

जीवघेणी कसरत

सातारा : शहरातील रस्त्यावर मोठे फलक लावलेले आहेत. या ठिकाणी जाहिरातीचा फलक लावण्यासाठी मजुरांना जीवघेणी कसरत करावी लागते. अनेक कारागीर जमिनीपासून ५०-६० फूट उंचीच्या फलकांच्या सांगाड्यावर हेल्मेटही वापरत नाहीत.

००००००

बसस्थानकामध्ये

सीसीटीव्ही कॅमेरे

सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावरून बसस्थानकातील प्रत्येक हालचालींवर पोलिसांची नजर असते. यामुळे अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच उकल होत असते. यामुळे या यंत्रणेचा पोलिसांना चांगलीच मदत होत असते.

Web Title: Open fuse box in Satara taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.