कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 03:02 PM2018-09-06T15:02:28+5:302018-09-06T15:03:58+5:30

सातारा जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावासने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. तर कोयना परिरसात २४ तासांत अवघा ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

Opening of rain in major dam premises with coal | कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावसाची उघडीप

कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावसाची उघडीप

ठळक मुद्देकोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावसाची उघडीप२४ तासांत अवघा ३ मिलीमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावासने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. तर कोयना परिरसात २४ तासांत अवघा ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे प्रमुख धरणे काठोकाठ भरली आहेत. पाण्याची आवक होत असल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नद्यांना पूर आले होते.

सध्या गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. तर दोन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरण परिसरात अवघा ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी धरण परिसरात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे.

Web Title: Opening of rain in major dam premises with coal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.