पावणेतीन लाखांची ‘चोरीसाखळी’ उघड

By admin | Published: February 25, 2015 09:44 PM2015-02-25T21:44:05+5:302015-02-26T00:16:29+5:30

गुन्हे शाखेची कारवाई : सराईत आरोपी गजाआड; सोने, मोटारसायकली जप्त

Opening of 'steal' stages of Rs | पावणेतीन लाखांची ‘चोरीसाखळी’ उघड

पावणेतीन लाखांची ‘चोरीसाखळी’ उघड

Next

सातारा : सराईत गुन्हेगार किरण बबन पाटील याला गजाआड करून स्थानिक गुन्हे शाखेने सोनसाखळी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.किरण पाटील हा पोवई नाका परिसरात संशयास्पदरीत्या मोटारसायकलवरून फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. सुमारे एक वर्षापासून विविध गंभीर गुन्ह्यांसाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. यात जबरी चोरी, खून, मोटारसायकल चोरी, अवैध शस्त्रविक्री असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. पोलिसांनी पोवई नाका परिसरात सापळा रचून त्याला अटक केली.चौकशीदरम्यान किरण पाटील याने बारावकरनगर सातारा येथील रेखा दिलीप बाबर यांच्या गळ््यातील मणीमंगळसूत्र हिसडा मारून चोरल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात इंद्रजित मोहन गुरव (रा. कोंढवे) याने त्यास मदत केली होती, असे त्याने सांगितले. गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि चोरून आणलेली आणखी एक मोटारसायकल यासह १ लाख ४० हजारांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. किरण पाटीलकडे अधिक तपास केला असता साखळी चोरीचे आणखी तीन गुन्हे केल्याचे त्याने कबूल केले. सातारच्या मंगळवार पेठेतील अनुराधा दत्तात्रेय प्रभाळे यांची १८ ग्रॅम वजनाची ४९ हजार ६८० रुपये किमतीची सोन्याची गोळी (रवा), कृष्णानगर येथील मंगल दिलीप कोल्हापुरे यांची १५ ग्रॅम सोन्याची ४१ हजार ४०० रुपये किमतीची सोन्याची गोळी, तसेच सदर बझार येथील रेखा प्रकाश जाधव यांचे सोन्याचे मंगळसूत्र, त्यात एक अष्टपैलू मणी व सोन्याच्या तारेत गुंफलेली १५ ग्रॅम वजनाची डोरली असा ४१ हजार ४०० रुपयांचा ऐवज त्याच्या कडून जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २ लाख ७२ हजार ४८० रुपये इतकी आहे.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पद्माकर घनवट यांनी केलेल्या या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, सहायक फौजदार काळे, पोलीस नाईक नाचण, बेबले, कॉन्स्टेबल संतोष जाधव, प्रवीण कडव, योगेश पोळ, नितीन भोसले, महेश शिंदे, मारुती आडागळे, संजय जाधव यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)


पुन्हा साखळीचोरी
सातारा : साखळीचोरीचे चार गुन्हे उघड होऊन आरोपी जेरबंद झाला असतानाच मंगळवारी सायंकाळी शहरात पुन्हा साखळीचोरीच्या दोन घटना घडल्या. यातील एका घटनेत सोन्याचे मंगळसूत्र तर दुसऱ्या घटनेत ‘बेन्टेक्स’ची बोरमाळ चोरट्यांनी हिसकावली. विशेष म्हणजे, तासाभराच्या अंतरात एकाच भागात या दोन घटना घडल्या. उषाराणी विक्रम कारंडे (वय ३५, रा. सदर बझार) या बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास चालत निघाल्या होत्या. मोटारसायकलवरून दोघेजण मागून आले आणि त्यांच्या गळ्यातील ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेले. सदर बझार परिसरातच सायंकाळी सात वाजता सावित्रा माधवराव भोसले (वय ६०) यांची एक ग्रॅम वजनाची ‘बेन्टेक्स’ची बोरमाळ चोरट्यांनी अशाच प्रकारे हिसकावून नेली.

Web Title: Opening of 'steal' stages of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.