महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज पूर्णपणे ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 04:19 PM2022-04-07T16:19:48+5:302022-04-07T16:20:17+5:30

महसूल विभागातील कारकून पदे त्वरित भरावीत या मागणीसह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे.

Operation completely halted due to strike of revenue employees | महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज पूर्णपणे ठप्प

महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाज पूर्णपणे ठप्प

googlenewsNext

सातारा : महसूल विभागातील कारकून पदे त्वरित भरावीत या मागणीसह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने संप पुकारला आहे. या राज्यव्यापी संपामुळे चौथ्या दिवशी महसूल विभागाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले.

जिल्ह्यासह राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. संपाचा आज चौथा दिवस आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रांताधिकारी तसेच तहसील कार्यालय मधील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. ठराविक कर्मचारीच कामावर दिसतात. परंतु महसूल आस्थापनेवर असणारे ५५० कर्मचारी हे संपावर गेले आहेत.

आज, गुरुवारी मंत्रालयात याप्रश्नी चर्चा होणार होती, काही कर्मचारी मुंबईत दाखल झाले होते. संघटनेचे पदाधिकारी मुंबईला गेले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र एकही कर्मचारी कामावर हजर नाही. प्रतीक कार्यालयामध्ये तहसीलदार प्रांताधिकारी असे वरिष्ठ अधिकारीच काम करताना पाहायला मिळते.

राज्यात महसूल सहायकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून एका महसूल सहायकाकडे दोन ते तीन संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावात असून महसूल सहायक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दीड ते दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचे दिसून येते.

शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक दहा मे २०२१ अन्वये नायब तहसीलदार संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे व त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडल अधिकारी यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढले आहे. परंतु, अव्वल कारकून व मंडळ अधिकारी हा जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्याय करत असल्याने हे पत्र तत्काळ रद्द करण्यात यावे, अशा कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

Web Title: Operation completely halted due to strike of revenue employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.