अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय बलुनफिस्टामध्ये सातारकर कॅप्टनला कर्तृत्वची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:46 PM2019-09-21T23:46:34+5:302019-09-21T23:47:58+5:30
संग्राम पवार यांनी ओमानच्या इतिहासात पहिला गरम हवेचा बलून उडविणारा पायलट होण्याचा बहुमान यापूर्वीच पटकाविला आहे. कॅप्टन संग्राम पवार हे पुण्यातील कामशेत व लोणावळा या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाºया परिसरात गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी आॅक्टोबर ते एप्रिल या काळात बलून रायडिंगचे प्रयोग यशस्वीपणे राबवित आहेत.
सातारा : अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय बलुनफिस्टामध्ये साताऱ्यातील कॅप्टन संग्राम पवार हे भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. दि. ५ ते १३ आॅक्टोबर या कालावधीत अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय न्युमेक्सिकोमधील ४८ व्या अल्बुकर्क बलुनफिस्टामध्ये पवार यांना ही संधी मिळणार आहे.
संग्राम पवार यांनी ओमानच्या इतिहासात पहिला गरम हवेचा बलून उडविणारा पायलट होण्याचा बहुमान यापूर्वीच पटकाविला आहे. कॅप्टन संग्राम पवार हे पुण्यातील कामशेत व लोणावळा या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणाºया परिसरात गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी आॅक्टोबर ते एप्रिल या काळात बलून रायडिंगचे प्रयोग यशस्वीपणे राबवित आहेत.
एआयबीएफ हा जगातील सर्वात मोठा हॉट एअर बलून मेळावा आहे. यामध्ये २५ देशांमधील ६५० हून अधिक पायलट ५५० बलून सहभागी होत आहेत. यात जगातील विविध देशांतून १० लाखांहून अधिक पर्यटकांनी आपला सहभाग नोंदविला आहे.
कॅप्टन संग्राम पवार यांचे मूळगाव सातारा तालुक्यातील पवारवाडी हे असून, ते साताºयाचे सुप्रसिद्ध कुस्तीपटू दिवंगत श्रीरंग जाधव यांचे नातू, सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रकाश पवार यांचे चिरंजीव आहे. तसेच पुणे येथील नितीन शितोळे (सरकार) यांचे ते जावई आहेत. संग्राम पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.
मला सुरुवातीपासूनच धाडसी खेळांची आवड आहे. माझ्या कुटुंबीयांनीदेखील माझ्यातील सुप्त गुणांना नेहमीच वाव दिला. इतरांपेक्षा काही वेगळं करून दाखविण्याचं साहस मला आहे.
- संग्राम पवार, कॅप्टन