सरपंचपदाला न्याय दिल्यास भविष्यात तालुकास्तरावर संधी : निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:36 AM2021-03-07T04:36:03+5:302021-03-07T04:36:03+5:30
आदर्की : ‘तरुणपणीचा कार्यकाळ शहरात व्यवसाय, नोकरीत घालवून शहरातील विकासकामांची पद्धत गावाकडे वापरुन दिलीप नलवडे यांनी सरपंचपदाला न्याय दिल्यास ...
आदर्की : ‘तरुणपणीचा कार्यकाळ शहरात व्यवसाय, नोकरीत घालवून शहरातील विकासकामांची पद्धत गावाकडे वापरुन दिलीप नलवडे यांनी सरपंचपदाला न्याय दिल्यास भविष्यात त्यांना तालुका पातळीवर संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल,’ अशी ग्वाही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विश्वासराव निंबाळकर यांनी दिली.
आळजापूरचे नवनिर्वाचित सरपंच दिलीप नलवडे यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी निंबाळकर म्हणाले, ‘नलवडे यांनी गावाचा सर्वांगिण विकास करताना ग्रामस्थांना पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावा.’ सरपंच दिलीप नलवडे म्हणाले, ‘फलटण तालुक्यात निष्ठावंत, नि:स्वार्थी राजकारणी म्हणून विश्वासराव निंबाळकर यांची ओळख आहे. त्यांनी सांगितलेले विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार आहे.’ यावेळी शंकरराव निंबाळकर, रघुनाथ नलवडे, मोहनराव नलवडे, शिवाजी निंबाळकर, शिवाजी नलवडे उपस्थित होते.
फोटो ०६ आळजापूर सत्कार
आळजापूरचे सरपंच दिलीप नलवडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शंकरराव निंबाळकर, विश्वासराव निंबाळकर उपस्थित होते.