Lok Sabha Election 2019 विरोधकांकडून मतदारांना चिरडण्याचे काम: उदयनराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:12 PM2019-04-10T23:12:04+5:302019-04-10T23:12:46+5:30

सातारा : ‘ज्या विश्वासाने जनतेने मोदींना मतदान केले, त्याची परतफेड अपकाराने करण्याची वृत्ती विरोधकांकडे दिसून येते. जनतेला तळहातावरील फोडाप्रमाणे ...

Opposition to crush voters: Udayan Raje Bhosale | Lok Sabha Election 2019 विरोधकांकडून मतदारांना चिरडण्याचे काम: उदयनराजे भोसले

Lok Sabha Election 2019 विरोधकांकडून मतदारांना चिरडण्याचे काम: उदयनराजे भोसले

Next

सातारा : ‘ज्या विश्वासाने जनतेने मोदींना मतदान केले, त्याची परतफेड अपकाराने करण्याची वृत्ती विरोधकांकडे दिसून येते. जनतेला तळहातावरील फोडाप्रमाणे जपण्याऐवजी पायाखाली चिरडले. सत्तेचे केंद्र्रीकरण करून लोकशाही संपुष्टात आणण्याचा कुटील डाव विरोधक खेळत आहेत. नोटबंदी, जीएसटी, रेरा असे निर्णय मोदींनी अंमलात आणले. त्यामुळे जनतेची जीवनशैली बिघडली,’ असा आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.
साताऱ्यात झालेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. सुषमा अंधारे, सभापती वनिता गोरे, जयश्री गिरी, नगराध्यक्षा माधवी कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा समिंदरा जाधव, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा धनश्री महाडिक, जिल्हा परिषदेच्या सदस्या अर्चना रांजणे, अर्चना देशमुख, अनिता चोरगे, कमल जाधव, सुनीता कचरे, भाग्यश्री मोहिते उपस्थित होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, ‘ज्यांना झेप घ्यायची होती त्यांचीही कुचंबणा झाली. जे नोकरीवर होते त्यांनाही अस्थिरतेला सामोरे यावे लागले. उदरनिवार्हाचं साधन हिरावल्याने अनेकांची त्रेधा तिरपीट झाली.
शिवरायांना अभिप्रेत असलेले स्वराज्य आणि देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्रसैनिकांचे हौतात्म यांची जाणीव ठेवून हा देश प्रगतिपथावर न्यायला हवा. सत्ताधाऱ्यांना केवळ तुमचे मत हवे होते, त्यांना विचार करणारी जनता नकोय. त्यामुळे त्यांच्याविषयी देशाला महासत्तेकडे न्यायचे असेल तर विचारधारा जोपासणे गरजेचे आहे.’
अ‍ॅड. अंधारे, पूर्व प्राथमिक शिक्षिका संघटनेच्या शोभाताई पवार यांचेही भाषण झाले.

Web Title: Opposition to crush voters: Udayan Raje Bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.