वाई पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:38+5:302021-08-12T04:44:38+5:30

वाई : वाई पालिकेच्या कामामध्ये मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी अनियमितता तसेच कर्तव्यात कसूर केल्याबाबत उपनगराध्यक्ष अनिल लक्ष्मण सावंत यांनी ...

Order of inquiry into the arbitrary conduct of the head of the Wai Municipality | वाई पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या चौकशीचे आदेश

वाई पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या चौकशीचे आदेश

Next

वाई : वाई पालिकेच्या कामामध्ये मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी अनियमितता तसेच कर्तव्यात कसूर केल्याबाबत उपनगराध्यक्ष अनिल लक्ष्मण सावंत यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. त्याच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यासाठी चौकशी अहवाल ३१ ऑगस्टपर्यंत देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अपर सचिव प्रतिभा पाटील यांनी आदेश दिले आहेत.

उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी २९ जुलै २०२१ रोजी मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याविरुद्ध मनमानी कारभार व कर्तव्यात कसूर केल्याबाबत नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर २८ जानेवारी २०२० रोजीच्या ठराव क्रमांक २५ मध्ये फेरफार करून, तज्ज्ञ वास्तुविशारद यांच्या सल्ल्याची फी म्हणून जादा बिल देणे, पालिका हद्दीमध्ये स्वत:च्या मजुरासह ट्रॅक्टर ट्रॉली साहाय्याने स्वत:ची जंतुनाशके वापरून फवारणी करणे यासाठी निविदा प्रणालीद्वारे द्वि-लखोटा पद्धतीने निविदा मागवून, वर्तमानपत्रात ई-निविदा सूचना प्रसिद्ध केल्याबाबत नमूद करून प्रत्यक्ष तशी कार्यवाही न करता पालिकेच्या सभेची मंजुरी न घेता कार्यवाही करणे, जिल्हाधिकाऱ्यांची आवश्यक प्रशासकीय मंजुरी न घेता कचरा संकलन घंटागाड्यांची बेकायदेशीर खरेदी करणे, न्यायालयीन प्रकरणे चालविण्यासाठी वकिलांची फी कोणतीही मंजुरी न घेता देणे, इतिवृत्तामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करणे, ऑडिट रिपोर्ट सभागृहापुढे सादर न करणे, मंजूर निधीचा योग्य त्या कालावधीमध्ये वापर न करणे, मुख्याधिकारी हे मुख्यालयी न राहणे, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे व इतर काही नगरसेवकांसमवेत संगनमत करून मनमानी कारभार करणे तसेच कर्तव्यात कसूर केल्याबाबत तक्रार करून योग्य कारवाईची मागणी केली होती.

या तक्रारीची दखल घेऊन नगरविकास विभागाने मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्या कारभाराची चौकशी करावी आणि तसा अहवाल देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

चौकट

दापकेकर यांच्याकडे पदभार

मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ या रजेवर असून, त्यांच्याशी संपर्क होत नाही. पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना वाई नगरपालिकेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

Web Title: Order of inquiry into the arbitrary conduct of the head of the Wai Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.