मुलाच्या मृत्यूनंतर अवयव दान--डोळे, किडनी, हृदय, लिव्हरमुळे दुसºया रुग्णांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 11:41 PM2017-09-29T23:41:28+5:302017-09-29T23:41:58+5:30

शामगाव : अवयवाच्या रुपाने आणखी कोणाचा तरी मुलगा वाचेल, असा विचार करीत

Organ donation after child's death - eyes, kidney, heart, liver damage to other patients | मुलाच्या मृत्यूनंतर अवयव दान--डोळे, किडनी, हृदय, लिव्हरमुळे दुसºया रुग्णांना जीवदान

मुलाच्या मृत्यूनंतर अवयव दान--डोळे, किडनी, हृदय, लिव्हरमुळे दुसºया रुग्णांना जीवदान

Next
ठळक मुद्देनिगडीतील दाम्पत्याचा निर्णय;

लोकमत न्यूज नेटवर्क
शामगाव : मुंबईच्या एका खासगी कंपनीत इंजिनिअर असलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आई, वडिलांसह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला; पण मुलाच्या मृत्यूचं डोंगराएवढं दु:ख बाजूला सारून या कुटुंबाने त्याचे अवयव दान केले. मुलाचा मृत्यू झाला असला तरी त्याच्या अवयवाच्या रुपाने आणखी कोणाचा तरी मुलगा वाचेल, असा विचार करीत या कुटुंबाने हा आदर्शवत निर्णय घेतला.

कºहाड तालुक्यातील निगडी गावातील चंद्रकांत घोलप हे अल्पशिक्षित. शेती करायची म्हटलं तरी क्षेत्रही अल्प. त्यामुळे कंपनीत नोकरी करून चंद्रकांत हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. काही वर्षांपूर्वी ते पत्नी कुसूम व तीन आपत्यांसह उदरनिर्वाहासाठी मध्यप्रदेशला गेले. काही वर्षांनी संबंधित कंपनी बंद पडली. अखेर पुन्हा हे कुटुंब मध्यप्रदेशातून नाशिकला गेले. त्याठिकाणी चंद्रकांत व कुसूम यांनी दोन मुले व मुलीला शिकवले. चंद्रकांत व कुसुम यांचा धाकटा मुलगा लोकेश यानेही उच्च शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तोही नवी मुंबईला भावाकडे राहण्यास गेला. त्याठिकाणी एक कंपनीत इंजिनिअर पदावर काम करीत होता.

गुरुवारी लोकेश कार्यालयाला जाण्यासाठी निघाला. त्याचा मित्रही त्याला घेण्यासाठी घरापर्यंत आला. दोघेजण दुचाकीवरून कंपनीत जाण्यासाठी निघाले. मात्र, काही अंतरावरच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यामध्ये लोकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाला. तेथील वाहतूक पोलिसांनी लोकेशला उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, तीन दिवसांनी डॉक्टरांनी लोकेशचा ‘ब्रेन डेड’ झाल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीय शोकसागरात बुडाले.लोकेशचे अवयव दान करण्याचा सल्ला डॉक्टरांनी कुटुबीयांना दिला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख असतानाही यावर विचार करून लोकेशच्या आई, वडील बहीण व भाऊ यांनी लोकेशचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
 

माझ्या मुलाच्या अवयवांमुळे चार जणांना जीवदान मिळाले. अवयव दानाचा निर्णय माझ्यासह कुटुंबीयांसाठी खूप अवघड होता; पण लोकेशच्या अवयवांमुळे आणखी कोणाचा तरी मुलगा वाचेल, या जाणिवेतून आम्ही हा निर्णय घेतला.
- चंद्रकांत घोलप,
लोकेशचे वडील

Web Title: Organ donation after child's death - eyes, kidney, heart, liver damage to other patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.