भरतगाववाडी येथे कृषी सप्ताहाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:17+5:302021-07-07T04:48:17+5:30
नागठाणे : भरतगाववाडी (ता. सातारा) येथे कृषी विभागातर्फे कृषी सप्ताह कार्यक्रम आयोजित केला होता. तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ ...
नागठाणे : भरतगाववाडी (ता. सातारा) येथे कृषी विभागातर्फे कृषी सप्ताह कार्यक्रम आयोजित केला होता. तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नागठाणेचे मंडल कृषी अधिकारी युवराज काटे, कृषी सहाय्यक दया कांबळे, उपसरपंच संपत मोहिते, ग्रामविकास अधिकारी संजय यादव, विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष शरद इंगळे तसेच सदस्य सुशीला घोरपडे उपस्थित होते.
या सप्ताहात खरीप हंगामातील विविध योजना, मनरेगाविषयी माहिती देण्यात आली. यावेळी मंडल कृषी अधिकारी युवराज काटे यांनी मनरेगांतर्गत बांधावरील फळ लागवड व नॅपेड कंपोस्ट खत युनिट, गांडूळ युनिट याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
कृषी सहाय्यक दया कांबळे यांनी शरद इंगळे यांच्या शेतात गांडूळ युनिट तयार करण्यासाठी आखणी करून दिली. याविषयी सखोल मार्गदर्शनही केले. दया कांबळे यांनी प्रास्तविक केले तर अनिता चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका जयश्री जगताप, युवा मंचचे अध्यक्ष रोहन इंगळे उपस्थित होते.