मधमाशा पालन शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:34 AM2021-03-15T04:34:37+5:302021-03-15T04:34:37+5:30
बामणोली : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांत मध केंद्र योजना (मधमाशापालन) राबविण्यात ...
बामणोली : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यांत मध केंद्र योजना (मधमाशापालन) राबविण्यात येत आहे. या योजनेत मंडळाकडून मधमाशापालन उद्योग करण्याबाबतचे विनाशुल्क तांत्रिक प्रात्यक्षिके व जनजागृती एक दिवसाचे शिबिर बुधवार, दि. १७ मार्च रोजी पंचायत समिती मेढा सभागृह येथे सकाळी ११.३० ते दुपारी ४.०० पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. जावळी तालुक्यात मधमाशापालन व्यवसायास मोठा वाव असून, मध केंद्र योजनेद्वारे या भागातील शेतकरी, नवउद्योजकांना मधमाशापालन व्यवसायाद्वारे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मधुमक्षिका पालन शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय तज्ज्ञ अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे.