‘लोकमत सखी मंच’कडून ‘माझा भाऊ माझा अभिमान’ स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:46+5:302021-08-22T04:41:46+5:30

सातारा : 'लोकमत’ सखी मंचतर्फे सखींसाठी रक्षाबंधनानिमित्त 'माझा भाऊ माझा अभिमान' सेल्फी, फोटो विथ ब्रदर स्पर्धेचे आयोजन केले आहे. ...

Organizing 'My brother, my pride' competition from 'Lokmat Sakhi Manch' | ‘लोकमत सखी मंच’कडून ‘माझा भाऊ माझा अभिमान’ स्पर्धेचे आयोजन

‘लोकमत सखी मंच’कडून ‘माझा भाऊ माझा अभिमान’ स्पर्धेचे आयोजन

Next

सातारा : 'लोकमत’ सखी मंचतर्फे सखींसाठी रक्षाबंधनानिमित्त 'माझा भाऊ माझा अभिमान' सेल्फी, फोटो विथ ब्रदर स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा २१ ते २५ ऑगस्टपर्यंत आयोजित केली आहे.

रक्षाबंधन हा बहीण-भावाचे नाते अतूट करणारा सण. या सणानिमित्त बहीण-भावाच्या प्रेमातील गोडवा वाढविणारी स्पर्धा 'लोकमत सखी मंच' च्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

दि. २१ ते २५ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत या स्पर्धेसाठी मिळालेल्या फोटोवर लाइक्स व सहभाग ग्राह्य धरला जाईल. बहीण भावाचा हा फोटो, सेल्फी आमच्या https://www.facebook.com/ lokmatevent या फेसबुक पेजवर पाठवायचा आहे. एक स्पर्धक एकच फोटो पाठवू शकतो. सेल्फी किंवा फोटो हा भावाला राखी बांधताना काढलेला असावा. फोटो पोस्ट करताना भाऊ-बहीण नात्याबद्दल काही ओळी, आपले नाव, शहर लिहून पाठवणे अनिवार्य असेल. स्पर्धेचा निकाल २८ ऑगस्ट रोजी आपल्या फेसबुक पेजवर जाहीर करण्यात येईल. स्पर्धेत लहान मुलांच्या फोटोंचा सहभाग करून घेतला जाणार नाही, तसेच स्पर्धेसंदर्भातील सर्व अधिकार आयोजकांकडे राखीव असतील. या स्पर्धेतून काढले जाणारे विजेते लाईक्सनुसार तीन आणि परीक्षणानुसार तीन असणार आहेत. त्यांना मिळणार आहे आकर्षक बक्षिसे. अधिक माहितीसाठी ९९६००३००६९ किंवा ८७९६२४११११ या क्रमांकावर संपर्क करू शकता. स्पर्धेसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील सखींना सहभागी होता येणार आहे.

चौकट..

गिफ्ट पार्टनर-थिंक थिन फिटनेस स्टुडिओ

थिंक थिन फिटनेस स्टुडिओ हे साताऱ्यामध्ये कार्यरत असून, आजपर्यंत ८००० लोकांना वजन कमी करण्यासाठी सोप्या, साध्या पद्धतीने मदत केली आहे, तसेच साताराव्यतिरिक्त आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय सर्व्हिस उपलब्ध करून देत आहे. आहार मार्गदर्शक म्हणून थिंक थिन फिटनेस स्टुडिओ ग्लोबली काम करते.

Web Title: Organizing 'My brother, my pride' competition from 'Lokmat Sakhi Manch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.