संगणकीकृत सातबारामधील प्रलंबित नोंदींसाठी विशेष कॅम्पचे आयोजन : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:08+5:302021-03-18T04:39:08+5:30

सातारा : प्रलंबित नोंदी निर्गमित करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक मंडल स्तरावर मंडल अधिकारी व तलाठी यांनी २३ मार्च रोजी सकाळी ...

Organizing special camp for pending entries in computerized Satbara: Collector | संगणकीकृत सातबारामधील प्रलंबित नोंदींसाठी विशेष कॅम्पचे आयोजन : जिल्हाधिकारी

संगणकीकृत सातबारामधील प्रलंबित नोंदींसाठी विशेष कॅम्पचे आयोजन : जिल्हाधिकारी

Next

सातारा : प्रलंबित नोंदी निर्गमित करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक मंडल स्तरावर मंडल अधिकारी व तलाठी यांनी २३ मार्च रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत एकदिवसीय कॅम्पचे आयोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह सर्व उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.

राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-फेरफार प्रणालीमध्ये जिल्ह्यातील १०० टक्के अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण कामकाज सुरू आहे. त्यामध्ये खरेदी-विक्री, वारस नोंदणी, बँक बोजा, ई-करार व इतर नोंदी निर्गत करून सातबारावरील नोंदी अद्ययावत करण्याचे काम केले जात असून नोंदी मंडलाधिकारी व तहसीलदार यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.

कॅम्पच्या ठिकाणी संबंधित तलाठी यांनी गावांचे फेरफार संचिका घेऊन वेळेवर हजर राहावे. २३ मार्च रोजी एकदिवसीय कॅम्पचे आयोजन करून, त्या दिवशी प्रलंबित असलेल्या नोंदी १०० टक्के निर्गत करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.

Web Title: Organizing special camp for pending entries in computerized Satbara: Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.