ऊसतोड शेतकऱ्याचा मुलगा बनला सहायक मोटार वाहन निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:00 PM2018-04-01T23:00:19+5:302018-04-01T23:00:19+5:30

Ossand became a farmer's son assistant motor vehicle inspector | ऊसतोड शेतकऱ्याचा मुलगा बनला सहायक मोटार वाहन निरीक्षक

ऊसतोड शेतकऱ्याचा मुलगा बनला सहायक मोटार वाहन निरीक्षक

googlenewsNext


म्हसवड : सामान्य ऊसतोड शेतकरी कुटुंबातील एक मुलगा आरटीओ अधिकारी बनण्याची किमया पळशी येथे घडली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतून हणमंत सुरेश दौंड यांची सहायक मोटार वाहन निरीक्षकपदी निवड झाली. त्यांनी १७६ गुण मिळवत राज्यात ३९० वा क्रमांक मिळविला.
अशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले हणमंत दौंड यांनी शिक्षणाचा जोरावर कुटुंबाला आधार आणि नावलौकिक वाढविण्याचं काम केलं आहे. सर्वच क्षेत्रात अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाºया पळशी गावात मोटार वाहन निरीक्षक अधिकाºयाची कमतरता होती. ती आता दूर झाली.
पळशी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण पूर्ण करून रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालयातून त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतलं. सातारा येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज आॅफ सायन्स महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कºहाडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून तीन वर्षांचा मॅकेनिकल डिप्लोमा केला. पुढे डिप्लोमातील गुणांच्या आधारे त्यांनी पिंपरी-चिंचवड कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, आकुर्डी येथील महाविद्यालयातून मॅकेनिकलची पदवी प्राप्त केली.

Web Title: Ossand became a farmer's son assistant motor vehicle inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.