कास संपर्क क्षेत्राबाहेर : मोबाईल कॉल करण्यासाठी कोण झाडावर तर कोण दुचाकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:03 AM2019-01-16T00:03:48+5:302019-01-16T00:03:53+5:30

पेट्री : कास तलावात अजूनही पाणी आहे. त्यामुळे हौसी पर्यटक सुटीचा आनंद घेण्यासाठी कासला येतात. परंतु येथे कोणत्याही मोबाईलला ...

Outside the Kos contact area: Who is the bicycle on a tree to make a mobile call? | कास संपर्क क्षेत्राबाहेर : मोबाईल कॉल करण्यासाठी कोण झाडावर तर कोण दुचाकीवर

कास संपर्क क्षेत्राबाहेर : मोबाईल कॉल करण्यासाठी कोण झाडावर तर कोण दुचाकीवर

Next

पेट्री : कास तलावात अजूनही पाणी आहे. त्यामुळे हौसी पर्यटक सुटीचा आनंद घेण्यासाठी कासला येतात. परंतु येथे कोणत्याही मोबाईलला रेंज नसल्याने महत्त्वाचे निरोप द्यायचे असल्यास पर्यटकांना मोबाईल घेऊन रेंजचा शोध घ्यावा लागतो. यासाठी काहीजण झाडावर चढतात तर कोण दुचाकीवर उभा राहतो. खूप प्रयत्नानंतर रेंज आल्यावर त्यांना हायसे वाटते.
चोहोबाजूने वेढलेल्या डोंगररांगा, त्यात दाट झाडी यामुळे हिवाळा तसेच पावसाळ्यात दाट धुक्यात हरवून जाणारे कास पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. हिरवागार निसर्ग आजही साद घालत असल्याने पर्यटक येतात; परंतु मोबाईलला रेंज नसल्याने संपर्क साधण्यासाठी रेंजच्या शोधात फिरावे लागते.
कास तलाव परिसरात काही तुरळक ठराविक रेंज येते. मोबाईलला रेंजच मिळत नसल्याने जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेले कास तलाव कायम ‘नॉट रिचेबल’ लागते. संपूर्ण जग इंटरनेटने व्यापले असले तरी सातासमुद्रापार ओळख असणाऱ्या कासला रेंजअभावी फोनही लागत नाही. या परिसरात पर्यटकांची हजारो रुपयांच्या भारी स्मार्टफोनचे एक प्रकारचे खेळणेच बनते.
फुलांचा हंगाम वगळता पर्यटकांची कास तलावावर निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी नेहमीच वर्दळ असते. येथील नयनरम्य नजराणा जिल्हा तसेच इतर जिल्ह्यातील पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशी अनेक कुटुंब तसेच तरुणाई कास तलावावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. येथे आल्यावर फोनला रेंजच मिळत नाही.
तलावाच्या मुख्य व्हॉल्व्हवर फोटोसेशन, पावसाळ्यात निसरड्या किनाºयावर गाडी घेऊन जाणे, किनाºयावर फोटोसेशन करत तरुणाईमध्ये होणारी हुल्लडबाजी चालते. परजिल्ह्यातून आलेल्या पर्यटकाला नातेवाइकांना इमर्जन्सी कॉल करावयाचा म्हटले तर रेंज मिळत नाही. ३१ डिसेंबर, गेट टुगेदर, विकएंड तसेच वर्षभर बहुतांशी वेळेला ओल्या पार्ट्यांचा परिसरात बेत आखला जातो. संगीताचा ठेका धरत मद्याचे पेग रिचवत हुल्लडबाजी करणाºया तरुणाईमध्ये अनेकदा हाणामारीत रुपांतर होते. अनुचित प्रकार अथवा अपघात घडल्यास परिसरात जवळपास पोलीस चौकी नसल्याने कॉल होऊ शकत नाही.

Web Title: Outside the Kos contact area: Who is the bicycle on a tree to make a mobile call?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.