ग्रीन पॉवर शूगर्सकडून कोविड केंद्रास ऑक्सिजन सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:38 AM2021-05-13T04:38:54+5:302021-05-13T04:38:54+5:30
औंध : गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स लि. या साखर कारखान्याकडून वडूज येथील कोविड केंद्रास ऑक्सिजन सिलिंडरची मदत करण्यात ...
औंध : गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स लि. या साखर कारखान्याकडून वडूज येथील कोविड केंद्रास ऑक्सिजन सिलिंडरची मदत करण्यात आली. कारखान्याचे कार्यकारी संचालक, सांगली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या संकल्पनेतून प्रांताधिकारी जनार्दन कासार व तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे ऑक्सिजन सिलिंडर सुपूर्द करण्यात आला.
याअगोदर कारखान्याच्या माध्यमातून कोविड योद्ध्यांना पीपीई किटचे वितरण करण्यात आले होते. तहसीलदार किरण जमदाडे यांनी व स्थानिक प्रशासनाने कारखान्याचे कार्यकारी संचालक व सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. कोरोनाच्या महामारीत खटाव तालुक्यातील कोरोना केंद्र, प्रशासनाला तसेच गावपातळीवरील विलगीकरण कक्षास यथाशक्ती मदत करण्याचा आमचा निर्धार आहे. आपण लवकरच या संकटातून बाहेर पडू, असा विश्वास संग्रामसिंह देशमुख यांनी व्यक्त केला.