सोना अलॉज् कंपनीतील ऑक्सिजन प्लांट सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:39 AM2021-04-25T04:39:20+5:302021-04-25T04:39:20+5:30

सातारा : लोणंद येथील पोलाद निर्मिती करणाऱ्या सोना अलॉज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लांट कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू ...

Oxygen plant at Sona Alloys Company started | सोना अलॉज् कंपनीतील ऑक्सिजन प्लांट सुरू

सोना अलॉज् कंपनीतील ऑक्सिजन प्लांट सुरू

googlenewsNext

सातारा : लोणंद येथील पोलाद निर्मिती करणाऱ्या सोना अलॉज कंपनीतील बंद असलेला ऑक्सिजन प्लांट कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू करण्यात आला. या प्लांटचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, प्रातांधिकारी संगीता चौगुले, तहसीलदार दशरथ काळे, धीरज चंद्रा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थावक प्रदीप राऊत आदी उपस्थित होते.

सोना अलॉज् पोलाद निर्मितीची कंपनी असून येथील बंद असलेला ऑक्सिजन प्लांट लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आला आहे. या ऑक्सिजन प्लांटमधून रोज ऑक्सिजनचे १५०० सिलिंडर भरले जातील. यामुळे जिल्ह्याची बहुतांशी ऑक्सिजनची गरज पुरविण्यास मदत होणार आहे. यामुळे ऑक्सिजनच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

फोटो ओळ : लोणंद येथील सोना अलॉज्‌ या कंपनीमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत झाले.

Web Title: Oxygen plant at Sona Alloys Company started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.