ऑक्सिजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:41 AM2021-05-07T04:41:45+5:302021-05-07T04:41:45+5:30

कोविडमध्ये महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील कोरोनाच्या आपत्कालिन स्थितीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना व कोविड ...

Oxygen Project, Kovid Hospitals | ऑक्सिजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना

ऑक्सिजन प्रकल्प, कोविड रुग्णालयांना

Next

कोविडमध्ये महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यातील कोरोनाच्या आपत्कालिन स्थितीत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना व

कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार तत्काळ कार्यान्वित करण्याच्या कार्यवाहीसाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात राज्यातील १० मोठ्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना २४ ते ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी, वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. ३५ कोविड रुग्णालयांना तत्काळ नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.

राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोविड बाधितांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यासाठी ऑक्सिजन निर्मितीला मोठा वेग देण्यात आला आहे. त्यासाठी नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची मागणी होत आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तसेच कोविड रुग्णालयांना मागणीप्रमाणे नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर कामे करण्याचे आदेश राज्याचे ऊजामंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे ही अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर सज्ज राहण्याची सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिल्या आहेत. परिणामी ज्या कामांना इतर वेळी साधारणत: ८ ते १० दिवसांचा कालावधी लागतो, ती कामे महावितरणकडून अवघ्या २४ ते ४८ तासांमध्ये युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.

प्रशासकीय तसेच तांत्रिक सोपस्कार बाजूला ठेवत महावितरणकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात ऑक्सिजन निर्मितीच्या तब्बल १० प्रकल्पांना महावितरणने अवघ्या ४८ तासांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभाराची सेवा दिली आहे. एकूण १४ हजार केव्हीए क्षमतेपेक्षा अधिक वीजभार कार्यान्वित करण्यात आला आहे. ऑक्सिजन प्रकल्पांची तातडीने क्षमता वाढ करण्यासाठी वाढीव वीजभाराची गरज निर्माण झाली होती. त्याबाबतचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर तत्काळ मंजुरी व आवश्यक तांत्रिक कामे ग्राहकांकडून पूर्ण झाल्यानंतर वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणकडून करण्यात आली आहे.

चौकट :

यामध्ये जेएसडब्लू (डोलवी, जि. रायगड) कंपनीला मागणीप्रमाणे दोन टप्प्यात १०९ एमव्हीए क्षमतेचा वाढीव वीजभार मंजूर करून कार्यान्वित करण्यात आला आहे. साताऱ्यातील के नायट्रोक्सिजन आणि सोना अलॉयज, मॉडर्न गॅस इंडस्ट्रिज (अंबरनाथ, जि. ठाणे), स्वस्तिक एअर प्रॉडक्ट्स (सिन्नर, जि. नाशिक), अहमदनगर इंडस्ट्रीयल गॅसेस (अहमदनगर), लिंडे इंडिया (पनवेल, वाशी) कंपनीचा समावेश आहे. नवीन वीजजोडणी देण्याची कामे महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. आतापर्यंत राज्यातील ३५ कोविड रुग्णालयांना वीजजोडणी देण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ११, अहमदनगर ६, पुणे व नंदुरबार जिल्हा प्रत्येकी ४, नाशिक, ठाणे व नागपूर प्रत्येकी २, धुळे, औरंगाबाद, पालघर जिल्हा प्रत्येकी एक आणि मुंबई उपनगरांचा समावेश आहे.

Web Title: Oxygen Project, Kovid Hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.