पी. डी. पाटील संस्थेची सभा खेळीमेळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:19+5:302021-04-22T04:40:19+5:30
पोतलेत डॉ. आंबेडकरांना जयंतीदिनी अभिवादन कऱ्हाड : पोतले (ता. कऱ्हाड) येथील नवजागृत मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन ...
पोतलेत डॉ. आंबेडकरांना जयंतीदिनी अभिवादन
कऱ्हाड : पोतले (ता. कऱ्हाड) येथील नवजागृत मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, ऋतुजा जगताप, वृषाली पाटील उपस्थित होते. सगरे यांनी पंचशील व प्रार्थना घेतली. राहुल कसबे यांनी आंबेडकरांचा शैक्षणिक, सामाजिक कार्याचा आढावा घेतला. बाबासाहेब जगताप, उदयसिंह पाटील, शिवाजी पाटील, संतोष कसबे, विकास जगताप, दयानंद कसबे, संतोष जगताप, शरद कसबे, बाळासाहेब कसबे, नितीन कसबे यांनी संयोजन केले. सोपान जगताप यांनी प्रास्ताविक केले. मंडळाचे अध्यक्ष सुनील जगताप यांनी आभार मानले.
रेठरे आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू
कऱ्हाड : कोरोना लस घेतल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत चक्कर आल्याने रेठरे बुद्रुक येथील संपत जाधव यांचा मृत्यू झाला होता. जिल्हा आरोग्य विभागाकडून जाधव यांचा मृत्यू कोराना लस घेतल्याने झाला नसून, तो अन्य कारणाने झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा लसीकरण विभागप्रमुख प्रमोद शेळके यांनी रेठरे बुद्रुक आरोग्य केंद्रास भेट दिली. घडलेल्या घटनेची माहिती घेऊन त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान, आरोग्य केंद्राला लस उपलब्ध झाल्याने लसीकरणाला पुन्हा सुरुवात झाली असून, ग्रामस्थांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
रुवले, मराठवाडीत कोरोनाची धास्ती
सणबूर : दिवसेंदिवस विभागात कोरोना कहर वाढत आहे. मराठवाडी आणि रुवले-पाटीलवाड (ता. पाटण) येथील प्रत्येकी एक अशा दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे ढेबेवाडी विभागात ढेबेवाडी, तळमावले, सणबूर येथील बाजारपेठा बंद ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पाटीलवाडी येथील ६५ वर्षीय पुरुषाचा सोमवारी मृत्यू झाला. संबंधिताच्या संपर्कातील दहाजणांना कोरोनासदृश लक्षणे आहेत. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.