वृक्षारोपणाचा वेग दोन वर्षांपासून मंदावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:24 AM2021-06-27T04:24:54+5:302021-06-27T04:24:54+5:30
कोपर्डे हवेली : ‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याने सर्व यंत्रणा त्यातच गुंतली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ...
कोपर्डे हवेली : ‘कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याने सर्व यंत्रणा त्यातच गुंतली आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून वृक्षारोपणाचा वेग मंदावला आहे.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाबरोबर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते. पावसाळ्यात हे वृक्षारोपण केले जाते. वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात येत असते. यामध्ये सहकारी संस्था, शाळा महाविद्यालये, कृषी विभाग ग्रामपंचायत, नगरपालिका आदींसह इतर घटक आघाडीवर असतात. फळ झाडे लागवडीसाठी कृषी विभाग अनुदान देतो.
गेल्या वर्षी आणि यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाचे वृक्षारोपणाचे प्रयत्न तोकडे पडत आहे. अपवाद आहे तो फळझाडे लागवडीचा. ते करण्यासाठी कृषी विभाग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. गेल्या काही वर्षांत ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत होते. त्याला कोरोनामुळे दोन वर्षांत मर्यादा आल्या आहेत. शाळा बंद आहेत. तर इतर संस्था, ग्रामपंचायत जिल्हा परिषद, नगरपालिका, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात गुंतल्या आहेत. त्यामुळेच दोन वर्षांपासून वृक्षारोपणाचा वेग मंदावला आहे.