लसीकरणाची कासवगती; प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी लागू शकतात दोन वर्षे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:28+5:302021-07-31T04:38:28+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच पुन्हा तिसऱ्या लाटेने जोर धरला आहे. आता या तिसऱ्या लाटेपासून लोकांचे ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच पुन्हा तिसऱ्या लाटेने जोर धरला आहे. आता या तिसऱ्या लाटेपासून लोकांचे जीव वाचविण्यासाठी वेगाने लसीकरण करणे हे महत्त्वाचे असताना, लसीकरणाचा वेग कासवगतीने सुरू आहे. त्याचे कारण म्हणजे लसीचा वारंवार होणारा तुटवडा कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. आरोग्य विभाग आपल्या परीने टार्गेट पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.
इतर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या घटली. मात्र, सातारा जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे, तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग पहिल्यासारखा नाही. लसीचे डोस कमी येत असल्यामुळे केवळ तीस ते चाळीस केंद्रांवरच सध्या लसीकरण सुरू आहे. त्यामुळे दिवसाला सध्या ४ हजार जणांचे लसीकरण होत आहे. इतक्या धिम्या गतीने जर लसीकरण सुरू असेल, तर प्रत्येकाला दोन्ही डोस मिळण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. हे यातून दिसून येत आहे.
कोट : अद्याप पहिलाच डोस मिळेना..!
शासनाने १८ वर्षांवरील युवकांना लस देण्याचे दोन महिन्यांपूर्वीच जाहीर केले आहे. आम्ही त्या दिवसांपासून लसीचा पहिला डोस मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रजिस्ट्रेशन करूनही डोस शिल्लक नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे अद्यापही लसीचा एकही डोस घेतला नाही.
ऋषिकेश साळुंखे- पाटण
.....................................
लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर लस संपली आहे, असे सांगितले जाते. अनेकजण पहाटेपासून केंद्रावर रांगा लावून बसतात. त्यामुळे लसीचा पहिला डोस कधी मिळेल, हे सांगता येत नाही. त्यातच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पहिला डोस तरी मिळावा, यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
सुधीर कदम- यादोगोपाळ पेठ, सातारा
...................................................
चाैकट : लसीकरण का वाढेना...
सातारा जिल्ह्यात सुरुवातीला ४४६ लसीकरण केंद्रे सुरू होती. त्यावेळी दिवसाला २८ हजार जणांचे लसीकरण होत होते. परंतु आता लसीचा तुटवडा होत असल्याने यातील अनेक लसीकरण केंद्रे बंद पडली. परिणामी दिवसाला ४ हजार ते ६ हजार अशाप्रकारे लसीकरण होत आहे. आरोग्य विभागाकडून अनेकदा जादा डोसची मागणी केली जाते. परंतु डोस येताना ९ आणि १० हजार अशा संख्येत येत आहेत. त्यामुळेच लसीकरणाचा वेग वाढला नसल्याचे पाहायला मिळत आहे.
चाैकट : २२ केंद्रांत सुरू आहे लसीकरण
जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाखांवर गेली आहे. असे असताना दोन्ही डोस घेतलेले ३ लाख ३४ हजार लोक आहेत. म्हणजे तब्बल ३१ लाख लोकांचे लसीकरण होण्यास अजून किती वर्षे लागतील, याचा अंदाजही प्रशासनाला नाही. त्यातच कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढतेय. असे असताना केवळ २२ केंद्रांवरील लसीकरण सुरू आहे. ही बाब जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे.
...........................................आकडेवारी
आत्तापर्यंत झालेले लसीकरण
आरोग्य कर्मचारी -४०५९९
पहिला डोस
३६२४२
८९ टक्के
दुसरा डोस
२६१४९
६४ टक्के
..............................................................................
फ्रंटलाईन वर्कर्स- ५१४७२
पहिला डोस
५४५१४
१० टक्के
दुसरा डोस
३१०३१
२५ टक्के
.......................................
१८ ते ४४ वयोगट -
पहिला डोस
- १६०११३,
१५ टक्के
दुसरा डोस
९५८५
१ टक्के
..........................................
४५ ते ५९
६० पेक्षा जास्त