कोविडमुक्तसाठी पाचगणी पालिका सरसावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:13+5:302021-04-22T04:40:13+5:30

पाचगणी : ‘पाचगणी नगरपरिषदेकडून शहरातील प्रत्येक प्रभाग वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन ...

Pachgani Palika moves for Kovidmukta! | कोविडमुक्तसाठी पाचगणी पालिका सरसावली!

कोविडमुक्तसाठी पाचगणी पालिका सरसावली!

googlenewsNext

पाचगणी : ‘पाचगणी नगरपरिषदेकडून शहरातील प्रत्येक प्रभाग वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हलची तपासणी केली जाणार असून, काही लक्षणे दिसून आल्यास अशांची नावे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देऊन त्यांची तपासणी करणार आहे. याकरिता आपल्या दारात येणाऱ्या आरोग्य कोविडदूतांना आपली योग्य माहिती देऊन सहकार्य करावे,’ असे आवाहन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पाचगणीकरांना केले आहे.

पाचगणी शहरात सध्या नव्या कोविड स्ट्रेंथने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्या रोखण्याकरिता पाचगणी नगरपरिषदेने त्रिसूत्री आरोग्य मोहीम हाती घेतली आहे. याबाबत मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रत्येक घरोघरी जाऊन आरोग्याची त्रिसूत्री मोहीम राबवली जाणार आहे. याकरिता दहा आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत, तर यामध्ये आरोग्य सेविका यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. ही आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन लेव्हल तपासणार आहेत. मोहिमेअंतर्गत पाचगणी नगरपरिषद शहरातील प्रत्येक प्रभाग वॉर्डमध्ये नगरपालिकेने तयार केलेल्या दहा आरोग्य पथकांमार्फत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणी पथकात तीन आरोग्य दूत असणार आहेत. या येणाऱ्या आरोग्य कोविडदूतांना आपल्या आरोग्याची योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पाचगणीकर नागरिकांना केले आहे.

याअगोदर पाचगणी शहरात ‘माझे कटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत शहरातील १६ हजार नागरिकांचे ट्रेकिंग, ट्रेसिंग, पाचगणी नगरपरिषद कोरोनाला हद्दपार करण्याकरिता आता ‘फोर टी’ हा उपक्रम राबविला आहे. त्याच धर्तीवर आता पुन्हा पर्यटननगरी कोरोनामुक्त करण्याकरिता पालिकेने कंबर कसली आहे. याकरिता वाॅर्ड व प्रभागनिहाय आरोग्य पथके घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची ऑक्सिजन लेव्हल व इतर आजारांची माहिती घेत रुग्णांची माहिती आरोग्य केंद्रात दिली जाणार असून, त्यांच्याद्वारे उपचार व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे या मोहिमेची तपासणी अत्यंत काळजीपूर्वक केली जात असून, प्रत्येक नागरिकाचे सहकार्य यास अपेक्षित असून या तपासणीची ऑनलाईन माहिती शासनास दिली जाणार आहे.

चौकट :

आजअखेर १५७ कन्टेन्मेंट झोन...

पाचगणी नगरपरिषदेने याअगोदर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत अनोखा ‘फोर टी’ प्लॅन राबवला असल्याने आताची मोहीम राबविणे अत्यंत सुकर होईल. कोरोना रोखण्यास पालिकेला या माध्यमातून नक्कीच यश येणार आहे. पाचगणी शहरात सध्या ५८ मायक्रो कंटेन्मेंट झोन कार्यरत असून, ९३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. आजअखेर १५७ कन्टेन्मेंट झोन झाले आहेत, तर आजपर्यंत एकूण बाधित रुग्ण ४५८ झाले आहेत.

२१पाचगणी

पाचगणी शहरात घरोघरी जाऊन कोविड पथके तपासणी करत आहेत.

Web Title: Pachgani Palika moves for Kovidmukta!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.