पाचवड-पाचगणी एस. टी. सुरु करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:22+5:302021-06-11T04:26:22+5:30
पाचगणी : जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत अत्यावश्यक सेवेत एस. टी. प्रवासाला परवानगी दिली. त्यानुसार दि. ८ रोजी पाचवड - ...
पाचगणी : जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत अत्यावश्यक सेवेत एस. टी. प्रवासाला परवानगी दिली. त्यानुसार दि. ८ रोजी पाचवड - पाचगणी मार्गावर एकच बस धावली; परंतु प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही सेवा खंडित झाली. ही सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
लॉकडाऊननंतर इतर अत्यावश्यक सेवा ठराविक वेळेत सुरू झाल्या आहेत. परंतु, एस. टी.ची लोकल प्रवासी वाहतूक ठप्प आहे. मेढा आगाराने पाचवड - पाचगणी मार्गावर पहिल्या दिवशी प्रवासी वाहतूक सुरू केली. मात्र, त्याची कल्पना प्रवाशांना नसल्याने या सेवेला अल्प प्रतिसाद मिळाला. तर दुसऱ्या दिवशी मेढा आगाराने ही बससेवा बंद केली. बस चालू झाल्याने लोकं दुसऱ्या दिवशी पाचगणी वाहतूक नियंत्रण विभागाकडे बसबाबत विचारणा करू लागले आहेत. मात्र, अद्याप ही बससेवा सुरू करण्यात आलेली नाही.
परिवहन विभागाने पाचवड - पाचगणी व वाई - महाबळेश्वर मार्गावर एकलं बससेवा सूरू ठेवल्यास हळूहळू प्रवासी संख्या वाढणार आहे. बससेवा सुरू करणार असल्याची पूर्वकल्पना प्रथमतः तेथील वाहतूक नियंत्रकांना द्यावी म्हणजे प्रवाशांनादेखील याची माहिती मिळू शकते, अशी अपेक्षा प्रवाशांमधून केली जात आहे.