सुवासिक तांदळासाठी लावले भाताचे बुचार, पोत सुधारण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 05:04 PM2020-12-04T17:04:56+5:302020-12-04T17:06:59+5:30

wai, farmar, sataranews वाईच्या पश्चिम भाग जास्त पर्जन्यमानाचा असल्याने येथे अनेक जातीवंत भाताच्या वाणापासून नवनवीन वाणांची लागवड केली जाते. भाताच्या खाचरातून पाटांच्या साहाय्याने सतत पाणी पुरवठा केला जातो. भाताचा पोत सुधारून सुवासिक तांदूळ व्हावा यासाठी शेतकरी भाताची काढणी करून खळ तयार करत आहेत. त्याभोवती बुचार (ऐरणी) रचून ठेवण्याचे परंपरा जुणी आहे. ती यंदाही जपली आहे

Paddy Butter planted for fragrant rice | सुवासिक तांदळासाठी लावले भाताचे बुचार, पोत सुधारण्यास मदत

सुवासिक तांदळासाठी लावले भाताचे बुचार, पोत सुधारण्यास मदत

googlenewsNext
ठळक मुद्देसुवासिक तांदळासाठी लावले भाताचे बुचार पोत सुधारण्यास मदत : वाईच्या पश्चिम भागात शेतात खळी तयार

वाई : वाईच्या पश्चिम भाग जास्त पर्जन्यमानाचा असल्याने येथे अनेक जातीवंत भाताच्या वाणापासून नवनवीन वाणांची लागवड केली जाते. भाताच्या खाचरातून पाटांच्या साहाय्याने सतत पाणी पुरवठा केला जातो. भाताचा पोत सुधारून सुवासिक तांदूळ व्हावा यासाठी शेतकरी भाताची काढणी करून खळ तयार करत आहेत. त्याभोवती बुचार (ऐरणी) रचून ठेवण्याचे परंपरा जुणी आहे. ती यंदाही जपली आहे.

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात खरीपातील पेरणी क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र भाताचे असते. यामध्ये प्रामुख्याने रोप लागवड व पेरणीचे भात केले जाते. हवामान, मातीचे प्रकार यानुसार प्रत्येक भागामध्ये भाताच्या वेगवेगळया जातीची लागवड जवळपास निश्चित झालेली आहे. प्रामुख्याने भातामध्ये हळवागट, निमगरवा गट, बारवा गट, सुवासिक गट व बासमती प्रकरातील अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन जाती व संकरित जाती असे गट असतात.

वाई तालुक्यात भातात सुवासिक गटातील इंद्रायणी, सुगंधा व इतर काही खासगी कंपनीच्या भाताच्या वाणाचा वापर होतो. इंद्रायणी वाणास भागात १४० ते १४५ दिवस लागतात. याबरोबरच धोम, अभेपुरी, गाढवेवाडी, पांडेवाडी, धावडी, पिराचीवाडी, वासोळे, वडवली, आसरे, मेणवली या गावात बासमती ३७०, रेठरे बासमती या वाणाचीही लागवड केली जाते.

कालावधी पूर्ण झालेली पिक हे कापणी करून विश्ष्टि पध्दतीने दिवाळीच्या आगोदर शेतामध्ये अथवा घराजवळ रचून ठेवला जातो. यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ ही मिळतो. त्याचा शास्त्रीय फायदा असा होतो की भात पेंढ्यातील संपूर्ण कस किंवा अर्क हा भाताच्या तांदळामध्ये उतरतो. यामुळे तांदळाला विशिष्ट चव येते. त्यामुळे या भागातील तांदळाला बाजारपेठेत मागणी असते.

Web Title: Paddy Butter planted for fragrant rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.