पावसामुळं घरात अडकलेल्या मुलांसाठी पडवीच मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:32 AM2021-07-25T04:32:16+5:302021-07-25T04:32:16+5:30

यामध्ये मुलं चोरचिठ्ठी, लपाछपी, आंधळी कोशिंबीर, गोट्या, डब्बा ऐसपैस, रंग ओळखणे, चाक फिरवणे, भोवरा, घोडा घोडा, आगगाडी, मूक अभिनय, ...

Padvi ground for children trapped in the house due to rain | पावसामुळं घरात अडकलेल्या मुलांसाठी पडवीच मैदान

पावसामुळं घरात अडकलेल्या मुलांसाठी पडवीच मैदान

Next

यामध्ये मुलं चोरचिठ्ठी, लपाछपी, आंधळी कोशिंबीर, गोट्या, डब्बा ऐसपैस, रंग ओळखणे, चाक फिरवणे, भोवरा, घोडा घोडा, आगगाडी, मूक अभिनय, चोर-पोलीस हे खेळ खेळत असतात. तर मुली सागरगोटे, लंगडी, कांदाफोडी, चंपोळ्या, चिपऱ्या, कावळा उडाला, भातुकली, भांडीकुंडी, नृत्य, फुगडी, मातीकाम, कोलाज काम, चित्रकाम, बाहुला-बाहुली, दोरउड्या, डोंगर-पाणी हे खेळ खेळतात. तसेच मुलं-मुली शिवाजी म्हणतो, आई माझ पत्र हरवलं, रंग ओळखा, सापशिडी, गाणी, शहरांच्या नावांच्या भेंडया, पास पास, डोंगर पाणी, विष-अमृत हे सांघिक खेळ खेळत असतात.

- जगदीश कोष्टी

एकाग्रता आणि कलागुणांना चालना

यातील शिवाजी म्हणतो, डोंगर-पाणी, विष-अमृत हे खेळ एकाग्रतेला चालना देतात. तर एकाने सूचना केली त्या पद्धतीने मूक अभिनय करणे, गाणे म्हणणे, नृत्य करणे हे कलागुणांना संधी मिळवून देत असतात. शहरी भागातील मुलं कॉम्प्युटर, मोबाईलमध्ये विविध गेम खेळत असली तरी या डोंगरी भागातील मुलांना आजही पारंपरिक खेळांतून विशेष आनंद मिळत असतो.

छोटे इंजिनिअरही तयार (२४ संडे फोल्डरमध्ये फोटो आहे.)

या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार घरांची रचना असते. त्याचप्रमाणे काही मोठी मुलं पाऊस थोडा थांबला तर त्यांच्या कल्पनेनुसार लहान-लहान घर तयार करतात. काट्या, कुराट्या, लाकडू, दोऱ्यांचा वापर करुन घर तयार करतात. त्यांना पाला, फांद्या बांधत असतात. त्यातून पाऊस आत जाऊ नये म्हणून साड्या टाकून आच्छादन टाकतात. त्यातून भावी इंजिनिअर तयार होतात. त्यापेक्षा नवनिर्मितीचा मोठा आनंद त्यांना यातून मिळत असतो.

चौकट

उन्हाळीसारखी पावसाळी सुट्टी

या भागात धो-धो पाऊस पडतो. त्यामुळे शाळेलाही इतर भागात उन्हाळी सुट्टी असते. त्याप्रमाणे पावसाळी सुट्टीही असते. शाळाच नसल्याने अभ्यासाची, गृहपाठ करण्याची चिंता नसते. त्यामुळे कितीही पाऊस पडत असला, तरी शाळेला जाण्याची चिंता मात्र नक्कीच नसते.

फोटो

२४ संडे फोल्डरमध्ये सेव्ह आहे...

बाहेर पाऊस पडत असल्याने ही मुलं बैलगाडी खेळत आहेत. चाकं लावलेल्या पाटावर एकाने बसायचं आणि दोरी बांधून दुसऱ्याने ओढायचं, हे खेळ खेळत असतात.

Web Title: Padvi ground for children trapped in the house due to rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.